.[प्रकाश राजेघाटगे ]
नविन अध्ययन-अध्यापनासाठी ए.आय. तंत्रज्ञान अधिक प्रभावी ठरेल तसेच शाळा व्यवस्थापनाच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रशिक्षण अधिक उपयुक्त ठरतील असा विश्वास माध्यमिकचे शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे यांनी व्यक्त केला.
पुसेगाव येथील श्री सेवागिरी विद्यालयातील निवड व वरिष्ठ वेतनश्रेणी प्रशिक्षणाच्या भेटी प्रसंगी चोपडे बोलत होते. अध्यक्षस्थानी डायटचे अधिव्याख्याता विजयकुमार कोरडे तर विद्यालयाचे प्राचार्य अशोक सावंत, प्राचार्य अनिल बोधे तसेच १२ सुलभक व २२५ प्रशिक्षणार्थी शिक्षक - शिक्षिका उपस्थित होते.
चोपडे पुढे म्हणाले, शिक्षकांना २१ व्या शतकातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स (ए.आय.), राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, समग्र प्रगती पुस्तक, नवीन कौशल्ये, व्यवसायिक शिक्षण आदी नविन शैक्षणिक प्रवाहाच्या आवाहनांची ओळख करून देणे व त्याद्वारे अध्ययन - अध्यापन अधिक सक्षम करणे हा या प्रशिक्षणाचा प्रमुख हेतू असल्याचे सांगून आपली शाळेचे व्यवस्थापन अधिक सक्षम बनवण्यासाठी आपण प्रयत्न करावा असे आवाहनही त्यांनी केले. तसेच बीआरसी च्या अभिनव उपक्रमाचे कौतुकही केले.
प्रशिक्षणातील यशोगाथा या विषयाअंतर्गत आंतरराष्ट्रीय जुदो पदक प्राप्त खेळाडू व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त कुमारी साक्षी हरिदास बनसोडे (सिद्धेश्वर कुरोली) आणि दोन हात नसूनही चार चाकी गाडी चालवण्याचे कौशल्य प्रात्यक्षिकाद्वारे दाखविणारा नवनाथ महाडिक (त्रिमली) या दोघांच्या यशोगाथेद्वारे प्रशिक्षणार्थींना नवीन ऊर्जा देणारी प्रेरणा प्राप्त झाली. प्रशिक्षण दरम्यान पर्यावरण दिन, महिलांसाठी वटपौर्णिमा दिन व शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी विजयकुमार कोकरे, प्राचार्य अनिल बोधे, एस.डी.जाधव यांनी मनोगत व्यक्त केली.स्वागत गणेश पवार यांनी केले.
प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.प्रमोद राऊत यांनी केले तर आभार प्राचार्य अशोक देशमुख यांनी मानले.
Social Plugin