माजी विद्यार्थी संजय कदम यांचेकडून स्कुल बॅगचे वाटप
बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
विसापूर गावचे सुपूत्र, मुंबई येथे नामांकित कंपनीत जनरल मॅनेजर पदावर कार्यरत असलेले संजय कदम यांनी विसापूर, ता.खटाव येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या १७५ विद्यार्थ्यांना मोफत स्कुल बॅग चे वाटप केले. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांची आर्थिक अडचणीमुळे शालेय साहित्य खरेदी करताना दमछाक होते. विद्यार्थ्यांची गरज ओळखून कदम यांनी सत्राच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांना दर्जेदार स्कुल बॅग दिल्या.
शालेय जीवनापासून अतिशय हुशार असलेले संजय कदम यांनी विविध आस्थापनेवर उच्चपदस्थ म्हणून काम पाहिले. यावेळी बोलताना संजय कदम म्हणाले की, माझ्या शालेय जीवनाचा पाया या शाळेत मजबूत झाला. आज असलेली माझी ओळख याच शाळेमुळे आहे. विसापूरच्या शाळेशी आणि मातीशी माझी नाळ कायम राहील आणि भविष्यात शाळेसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी कायम मदत करणार असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी अपार कष्ट करत राहावे, मेहनत घ्यावी. थोरामोठ्यांचा मान ठेवावा. सातत्य ठेवत जिद्दीने आणि चिकाटीने अभ्यास करण्याचा कानमंत्र संजय कदम यांनी विद्यार्थ्यांना दिला. केंद्रप्रमुख मा. बापूराव कुचेकर साहेब यांनी शिक्षण विभागाच्या वतीने संजय कदम यांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान केला.यावेळी त्यांच्या सुविद्य पत्नी स्नेहल कदम, कन्या अर्पिता, प्रगतशील शेतकरी बंधू राजेंद्र कदम, पोलीस दलात कार्यरत सतिश कदम, दत्तात्रय कदम, अमर कदम, किशोर कदम, रुपेश कदम, श्रेयश कदम आदी कदम कुटुंबीय, उपसरपंच राजेश ढोले, पोलीस पाटील प्रल्हाद सावंत, पोपट शिंदे, रामचंद्र लोहार, ज्ञानेश्वर साळुंखे, जितेंद्र अंधळकर, प्रमोद सावंत, संजय घाडगे आदी ग्रामस्थ, वैशाली नांदे, स्मिता शेळके, शुभांगी चव्हाण, वैशाली जाधव, रेश्मा बोडरे आदी शिक्षक उपस्थित होते. ज्ञानेश्वर धायगुडे यांनी स्वागत केले. मुख्याध्यापक लतिका कर्पे यांनी आभार मानले.
एस.एस.सी. बॅच १९९५-९६ चे माजी विद्यार्थी यांनी शाळेतील गरजू विद्यार्थी कृष्णात रविंद्र साळुंखे याच्या नावे ११५००/- रुपये ठेव ठेवून त्याचा संपूर्ण शालेय खर्च उचलत सामाजिक बांधिलकी जपली. संदिप कदम यांनी या विद्यार्थ्यास आवश्यक शालेय साहित्य देऊन मदत केली.
Social Plugin