बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
रयत शिक्षण संस्थेच्या ,श्री सेवागिरी विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक-पालक मेळावा आयोजित करण्यात आला . त्यामध्ये सर्व वर्गात आधुनिक हायटेक इंटरनेट युक्त अँड्रॉइड पॅनल बोर्ड बसवलेले आहेत व त्याद्वारे पारंपारिक खडू फळ्याशिवाय विविध रंगातील अक्षरे, आकृत्या, दैनंदिन बातम्या, युट्युब शैक्षणिक व्हिडिओ, तज्ञांची भाषणे ,प्रयोग यासाठी इंटरॅक्टिव्ह पॅनलचा वापर केला जातो. याचे मार्गदर्शन करण्यात आले . तसेच विद्यालयामध्ये एन.सी.सी. प्रशिक्षण , ए.आय. कोडींग कोर्स, ब्रीजिंग कोर्स, इंटरनेट युक्त संगणक सुविधा ,अटल ट्रिकलिंग लॅब , सेमी इंग्रजी , संस्कृत विषय, एस.एस.सी.बोर्ड व स्पर्धा परीक्षेमध्ये उत्कृष्ट यश, अनिवासी गुरुकुल प्रकल्प प्राप्त व सायंकाळ अभ्यासिका , क्रीडा स्पर्धा या सुविधा आहेत.तरी पुसेगाव पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांनी आधुनिक शिक्षण प्रणालीनुसार शिक्षण घेण्यासाठी विद्यालयामध्ये आज प्रवेश घ्यावा असे आवाहन विद्यालयाचे मुख्याध्यापक ए . बी. सावंत व सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे माजी चेअरमन व स्कूल कमिटीचे सदस्य श्री बाळासाहेब जाधव , मोहन तात्या जाधव व श्री संतोष जाधव यांनी हि आवाहन केले आहे.
Social Plugin