Ticker

6/recent/ticker-posts

आमदार संतोष पाटील दानवे यांच्या विशेष प्रयत्नाने सातेफळ ते जाफ्राबाद बस सेवा शाळेच्या विद्यार्थी सेवेत सुरू ..



टेंभुर्णी प्रतिनिधी विष्णु मगर 


जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील सातेफळ, निवडुंगा, डोणगाव, पोखरी, बुटखेडा ,अकोला देव येथील विद्यार्थ्यांना पुढील महाविद्यालयीन शिक्षणासाठी तालुका व इतर ठिकाणी जाण्यासाठी वाहतूक व्यवस्था नसल्यामुळे ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू लागले होते.

 मात्र सातेफळ येथील प्रभु बनकर यांनी जि.प . सदस्य दतु पाटील पंडित, आमदार संतोष पाटील दानवे यांचे विश्वासू, उध्दव दुनगहू यांच्या कडे मागणी केली. त्यांच्या या मागणीची दखल घेऊन, आमदार आमदार संतोष पाटील दानवे यांना कळविले असता आमदार यांनी लगेच एसटी महामंडळाच  संपर्क साधून पुढील गावा त विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी त्वरित बस सेवा सुरू करावी असं कळविले.

यावरून लगेच जाफराबाद आगार प्रमुख यांनी मानव विकास बस दिनांक 27 जून रोजी शुक्रवार पासून बस सेवा चालू केली आहे.यावेळी सातेफळ येथील उपसरपंच निवृत्ती पाटील बनकर.ग्रा.प.सदस्य प्रभु पाटील बनकर.सुभाष पाटील बनकर.पोलीस पाटील विलास बनकर.शिवाजीराव बनकर चंद्रकांत बनकर.नारायण बनकर.बाळु बनकर.किसनराव बनकर.विष्णु बनकर रमेश जगधने.व गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.तसेच बसचे चालक गायकवाड यांचे शाल श्रीफळ देवून प्रभु पाटील बनकर यांनी सत्कार केला .


आमच्या मागणीला सन्माननीय आमदार संतोष पा. दानवे आणि आगार प्रमुख जाफराबाद  यांनी त्वरित दखल घेऊन आमच्या विद्यार्थ्यांसाठी बस सेवा सुरू केल्याबद्दल आम्ही गावकऱ्यांच्या वतीने त्यांचे धन्यवाद मानवत आहे.प्रभु बनकर  ग्रामपंचायत सदस्य सातेफळ