Ticker

6/recent/ticker-posts

को. ए. सो. चंद्रकांत हरी केळुस्कर वैद्यकीय महाविद्यालयात नशामुक्त अभियान पंधरवडा संपन्न..



अलिबाग (रत्नाकर पाटील)

विद्यार्थ्यांनी आमली पदार्थपासून दूर रहावे, नशेच्या आहारी न जाता आपला लक्ष अभ्यासात केंद्रित करावे असे प्रतिपादन अलिबाग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर साळे यांनी केले. 

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या निर्देशनुसार आणि जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या संकल्पनेतून 12 जून ते 26 जून या कालावधीत नशामुक्त अभियान पंधरवडा साजरा करण्यात आला. यावेळी संपन्न झालेल्या कार्यक्रमात पोलीस निरीक्षक किशोर साळे यांनी उपस्थित विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले. विदयार्थ्यांनी नशामुक्ती ची शपथ घेतली.

यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. आशिष भगत, उप प्राचार्या डॉ. नम्रता ठाकूर, दहशतवादी विरोधी पथकाचे महेश चिमटे, विदयाधर गोंजी,डॉ. स्वप्ना शिंदे, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. साक्षी पाटील, क्रीडा प्रमुख डॉ. आनंद नाईक, डॉ. आरती गंभीर, डॉ. कविसा पाटील, डॉ. सूरज पाटील, जनरल सेक्रेटरी अक्षय काळनर, लेडीज रिप्रेजेंटेटीव्ह सानिका म्हात्रे आदी उपस्थित होते.

या अभियांनांतर्गत विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. यामध्ये अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आशिष भगत यांनी केले. आभार प्रदर्शन जनरल सेक्रेटरी अक्षय काळनर यांनी केले. तया सम्पूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सानिका म्हात्रे यांनी केले.