Ticker

6/recent/ticker-posts

शिरूरमध्ये हिंदी सक्तीविरोधात मनसेचा ठाम आवाज – ऍड. स्वप्नील माळवे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन



 शिरुर ग्रामीण प्रतिनीधी - (शैलेश जाधव)

शिरूर, 19 जून 2025 – हिंदी भाषा सक्ती विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनहित विधी विभागाच्या वतीने शिरूर तालुक्यात ठोस पाऊल उचलण्यात आले. मा. राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार, तसेच राज्याध्यक्ष *मा. किशोर भाऊ शिंदे व उपाध्यक्ष मा. अरुण भाऊ लंबगोळ यांच्या स्पष्ट मार्गदर्शनाखाली हे आंदोलन राबवण्यात आले.

 आंदोलनाचे नेतृत्व मनसे जनहित विधी विभागाचे जिल्हाध्यक्ष ऍड. स्वप्नील किशोर माळवे यांनी करत शिरूर तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी मा. कळमकर साहेब व विस्तार अधिकारी मा. शिंदे साहेब यांना अधिकृत निवेदन सादर केले.निवेदनाद्वारे शाळांमध्ये हिंदी भाषेची सक्ती थांबवावी, राज्यभाषा मराठीला योग्य मान मिळावा, आणि स्थानिक भाषेचा अवमान होऊ नये, अशी ठाम मागणी करण्यात आली.

यावेळी ऍड. स्वप्नील माळवे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की,"हिंदी ही आमची राष्ट्रभाषा असली तरी तिची सक्ती शिक्षणाच्या नावाखाली मराठी जनतेवर लादली जाणार नाही. आमचा विरोध भाषेच्या अभ्यासाला नाही, पण सक्तीला आहे."या निवेदनप्रसंगी मनसेचे अनेक स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, आणि जनहित विधी विभागाचे सदस्य उपस्थित होते.हे आंदोलन शांततेत पार पडले असले तरी मनसेने यानंतरही संघर्षाची भूमिका कायम ठेवण्याचा इशारा दिला आहे.