पुसेगाव: दि . [प्रतिनिधी ]
पुसेगाव पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दैनिक लोकमतचे प्रतिनिधी प्रा केशव जाधव, उपाध्यक्षपदी दैनिक प्रभातचे प्रतिनिधी प्रकाश राजेघाटगे तर सचिवपदी दैनिक ऐक्यचे प्रतिनिधी विलास कुलकर्णी यांची पत्रकार संघाच्या बैठकीत एकमताने निवड झाली. पुसेगाव पत्रकार संघाचे ज्येष्ठ पत्रकार संजय जाधव यांनी ही निवड घोषित केली.
पुसेगाव पत्रकार संघ हा सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतो. पुसेगाव परिसरातील बातमी , समस्या वृत्तपत्र च्या माध्यमातून सर्वांना पोहोचवण्यासाठी सर्वजण नेहमीच प्रयत्नशील असतात. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी साठी संघ सनदी अधिकाऱ्यांच्या प्रकट मुलाखती घेत असतो. तसेच पुसेगाव व परिसरातील धार्मिक व सामाजिक कार्यात संघ नेहमीच अग्रेसर असतो. अशी माहिती पुसेगाव पत्रकार संघाचे संस्थापक संजय जाधव यांनी दिली.
यावेळी पुसेगाव पत्रकार संघातील पत्रकार ऋषीकेश पवार , संतोष साळूंखे, निसार शिकलगार, अकबर भालदार, नितीन घोरपडे,, गणेश घाडगे इ सहभागी होते. प्रस्ताविक संतोष साळुंखे यांनी केले. आभार निसार शिकलगार यांनी मानले.पुसेगाव परिसरातील राजकीय , सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी सर्वांचे स्वागत व अभिनंदन केले.
Social Plugin