Ticker

6/recent/ticker-posts

छत्रपती शाहू महाराजांची जयंती सामाजिक दिन म्हणून साजरा



मारोती एडकेवार हिप्पारगा थडी /प्रतिनिधी

हिप्पारगा थडी : बहुजनाचे राजे आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज,यांची जयंती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिप्पारगा थडी येथे. सामाजिक न्याय दिवस म्हणून,साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात राजे छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रेरणादायी  कार्याची, सविस्तर माहिती देण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात जेष्ठ, शिक्षिका सौ देशपांडे मॅडम यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेस पूजन करण्यात आले. उपस्थित सर्व शिक्षकांनी, विद्यार्थ्यांना सामाजिक, समता,न्याय,बंधुत्व या आधारित मूल्यावर सखोल  मार्गदर्शन करण्यात आले.

 यावेळी संजय गायकवाड सर,आणि बालाजी गेंदेवाड सर, यांनी आपले विचार मांडताना. छत्रपती शाहू महाराजांच्या केलेल्या, सामाजिक कार्याचा मागासलेल्या समाज, वंचित घटक,यांना दिलेल्या संधी, व शैक्षणिक धोरणाचे  महत्त्व, व त्याने घडवलेले सामाजिक बदल यावर प्रेरणादायी मार्गदर्शन केले. शाळेतील विद्यार्थी कुमारी, मेराबी इमामसाब व कीर्ती उत्तमराव धसाडे विद्यार्थिनी,आत्मविश्वासपूर्वक विचार मांडले. त्यांनी सामाजिक न्याय या विषयावरती विचारातून शाहू महाराजांना  आदर व प्रेरणा प्रभावीपणे मांडले उपस्थित मुख्याध्यापक व शाळेतील अजय कोंडलवाडे, सर यांचा सुद्धा विशेष सहभाग होता. छत्रपती शाहू महाराज यांची, जयंती सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केल्यामुळे विद्यार्थ्यांना, संविधानातील न्याय,समता, व बंधुता याचा सखोल अभ्यास.विद्यार्थ्यांचा झाला. त्याबद्दल जिल्हा परिषद शाळेचे अभिनंदन.