Ticker

6/recent/ticker-posts

खासदार डॉ.कल्याण काळे यांनी घेतली खत टंचाई बाबत आढावा बैठक



अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ

 दि २७.०६.२०२५ शुक्रवारी रोजी जिल्ह्यात खत टंचाई बाबत जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे खासदार डॉ.कल्याण काळे यांनी बैठक घेऊन ऐन खरीपाच्या पेरणीच्या तोंडावर खत टंचाई बाबत आढावा घेतला ही कृत्रिम खत टंचाई आहे खत कंपन्या जाणीवपूर्वक पुरवठा करत नाहीत शेतकरी चढ्या दराने खत खरेदी करतो 200 लाख मे टन खताचं उद्दीष्ट आहे जुन महिन्यात 87000 हजार मे टन वितरणात आलेल आहे युरीया खताचा तुटवडा जाणीवपूर्वक केला जातो खता सोबत इतर उपवस्तु जबरदस्तीने दिल्या जातात त्यासाठी युरीयाची अट घातली जाते तसेच डीएपी खताची सुद्धा मोठ्या प्रमाणात टंचाई जिल्ह्यात जाणवत आहे.शेतकऱ्यांच्या माथी जबरदस्तीने नको असलेले खते व औषधे मारली जातात. 

याबाबत सविस्तर आढावा घेऊन अधिकारी व खत कंपन्यांच्या प्रतिनिधींना सूचना केल्या.नवीन E-Pos मशिन उपलब्ध करून देण्या बाबत सुचना केल्या जिल्ह्यात 1085 अधीकृत परवाना धारक आहेत.खत कंपन्यांना व जिल्हा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत सुसुत्रता येण्याबाबत सक्तीच्या सुचना केल्या.जालना जिल्ह्याची खताची मागणी एप्रिल २०२५ ते जुन २०२५ पर्यंत पुढील प्रमाणे आहे.युरिया मागणी २९५३४ मेट्रिक टन, पुरवठा २२४१८ मेट्रिक टन एकूण ७११६ मेट्रिक टन युरिया पुरवठा कमी आहे.तसेच डीएपी मागणी १३८८३ मेट्रिक टन, पुरवठा ८१७७ मेट्रिक टन एकूण ५७०६ मेट्रिक टन डीएपी पुरवठा कमी आहे.एमओपी मागणी १२३९ मेट्रिक टन,पुरवठा 593 मेट्रिक टन एकूण ६४६ मेट्रिक टन पुरवठा कमी तसेच एसएसपी मागणी १६०१६ मेट्रिक टन,पुरवठा १२५३३ मेट्रिक टन एकूण ३४८३ मेट्रिक टन पुरवठा कमी.खत कंपन्यांनी फक्त एनपीके चा पुरवठा मागणीपेक्षा जास्त केलेला आहे. या गंभीर परिस्थितीत शेतकऱ्यांना वेळेवर व मुबलक खत उपलब्ध होण्याबाबत सर्व संबंधित यंत्रणांना सजग होऊन योग्य नियोजन करून शेतकऱ्यांच्या प्रति असलेले दायित्व पूर्ण क्षमतेने निभावण्याचे निर्देश देण्यात आले.

       या वेळी फर्टीलायजर ब्लॉक या मोबाईल अँप चे उद्घाटन खा.डॉ.कल्याण काळे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले या अँप मुळे शेतकऱ्यांना कोणत्या दुकानात किती व कोणते खत उपलब्ध आहे.याची माहिती,खत विक्रेत्याचा मोबाईल नंबर उपलब्ध होणार आहे तसेच जिल्ह्यातील खताबाबत सर्व माहिती या अँप मुळे पारदर्शक होईल अशी आशा खा.डॉ.कल्याण काळे यांनी व्यक्त केली.

          या वेळी अप्पर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार,जिल्हा कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे,जिल्हा परिषदेचे प्र.कृषी अधिकारी पी.बी.बनसावडे,जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख,जि.प.जालना मा.कृषी सभापती रामधन कळंबे,जि.प.जालना चे मा.सभापती भानुदासराव घुगे नाना,जालना पं.स.चे माजी उपसभापती सोपानराव तिरुखे,श्री राम सिरसाठ,सुभाष मगरे,देवजीनाना जऱ्हाड,ज्ञानेश्वर शिंदे,विजय जऱ्हाड,अजय बनकर शेतकरी संघटनेचे सुरेशराव काळे,दत्तात्रय कदम, नारायणराव वाढेकर,अरुण पैठणे संबंधित सर्व विभागाचे अधिकारी,खत कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.