Ticker

6/recent/ticker-posts

महेंद्रशेठ घरत यांनी घेतली जयंत पाटील यांची सदिच्छा भेट!



अलिबाग(रत्नाकर पाटील) 

आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी शनिवारी (ता. २८) शेकाप नेते जयंत पाटील यांची अलिबागच्या 'शेतकरी भवन' येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार रामहरी रूपनवर, कॉंग्रेसचे सरचिटणीस मिलिंद पाडगावकर उपस्थित होते.

यावेळी जयंत पाटील आणि महेंद्रशेठ घरत यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. परदेशात केलेल्या प्रवासाच्या आठवणी जागवल्या. हसतखेळत झालेल्या संवादातून आपली वैचारिक बैठक कायम आहे, हे त्यांनी आवर्जून सांगितले.