Ticker

6/recent/ticker-posts

भाजप च्या वतीने वृक्षारोपण

 


प्रतिनिधी सागर शिरसाठ देवळा तालुका


मोदी सरकारच्या ११ वर्षांच्या पूर्ततेनिमित्त 'संकल्प से सिद्धी' अभियानांतर्गत पिंपळगाव (वा) देवदारेश्वर येथे देवळा तालुका भाजप च्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.

पिंपळगाव (वा.) येथील देवदारेश्वर मंदिर परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी देवदारेश्वर मंदिराचे महंत गणेशानंद पुरी जी महाराज, भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष किशोर आहेर, विनायक वाघ, हेमलता खैरनार, समाधान सोनजे, देविदास वाघ, रमेश वाघ, नंदू ठाकरे, विष्णू पाटील,पुंडलिक आहेर, शांताराम सुर्यवंशी, राजु आप्पा देवरे,योगेश वाघ, नंदू वाघ, पिंटू बागुल, नदिश थोरात, दिपक पगार यांच्यासह मेशी, खडकतळे,लोहणेर,दहिवड आणि पिंपळगाव येथील नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.