अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ
आज दि.१५/०७/२०२५ रोजी अंबड घनसावंगी रोड वरती वलखेडा पाटीजवळ फोर व्हिलर व दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे.या अपघातात फोर व्हिलर क्रियेटा व दुचाकी पल्सर गाडी होती हा अपघात खुप भीषण अपघात समोरासमोर झाला असून यात दोन सख्या भावांना गंभीर दुखापत झाली आहे सदरील घटना ही आज सकाळी०९वाजून ३०मी च्या वाजेच्या सुमारास घडली आहे यात चार चाकी क्रमांक MH ३४ BR ७०११ व दुचाकी क्रमांक MH २३ AM ४३२९ या गाडयाचा अपघातात झाला आहे. जखमींची नावे बाळू अशोक बर्डे वय ३८ व दिपक अशोक बर्डे वय २५ दोघे राहणार खडकेश्वर ता.अंबड असे आहे.घटनास्थळावरून नागरिकांनी अपघाताची माहिती 108 नंबर ला दिली असता ॲम्बुलन्स मधील डॉ.राधेश्याम गायकवाड व ड्राइवर रघुनाथ भवर यानी जखमींना घेऊन उपजिल्हा रुग्णालय अंबड येथे दाखल करण्यात आले.त्यावेळी डॉक्टर डमाळे मॅडम व डॉक्टर श्रीकांत पायमोडे यांनी जखमी वरती उपचार करुन पुठील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे पाठवले या अपघातात बाळू बर्डे याच्या मांडीला जबर इजा झाली आसुन तर दिपक बर्डे यांना उजव्या पायाला फॅक्चर झाले आहे.
Social Plugin