भवाडा प्रतिनिधी, पी के गावित
सुरगाणातील शेतकरी हे वरच्या पाऊसावर आधारित असून भात हे तेथील मुख्य पीक मानले जाते. पावसाने सुरुवात केल्यापासून शेतकरी हे भात लागवडीसाठी कामाला लागतात. भाताचे रोप तयार करण्यासाठी मे मन्यापासून ते जुलै चे पहिले आठवड्यापर्यंत काम करत असतात.
मे महिन्यात पाला पाचोळा गोळा करून ठेवतात आणि ते जाळया नंतर जूनच्या पहिल्या पावसात कीवा दुसऱ्या पावसात लगेच पेरणी करतात आणि जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात भात लागवडीसाठी तयार होतात. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात भात तयार होत असतो.
भात कापणीला आल्यानंतर गोळा करून व्यवस्थित ठेवतात आणि मळण्यासाठी बैलांचा वापर केला जातो किंवा ट्रॅक्टरने सुद्धा मळणी केली जाते. भाताची वरायटी, एक 70, सुकऱ्या, ज्ञानेश्वरी, वाडा कोलम, दप्तरी, खडसी कशा बऱ्याच पूर्वजापासून ते गावठी आणि हायब्रीड वरायटी तेथील शेतकऱ्यांच्या शेतात पाहायला भेटतात.
Social Plugin