Ticker

6/recent/ticker-posts

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त शिराढोण येथे राजुरेश्वर विद्यालयाच्या वतीने गुणवत्ता विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न



 अंबड प्रतिनिधी, गणेश सपकाळ 

 दि.३१/०५/२०२५ रोजी ग्रामपंचायत कार्यालय शिराढोण ता.अंबड येथे रणरागिनी, राजमाता,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी 300 वी जयंती निमित्त शिराढोण येथील १० वी १२ वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा राजुरेश्वर विद्यालय कर्जत यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.तसेच गावातील समाजसेवेत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या महिलांचा सुध्दा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार गावचे सरपंच संपत काका जमधडे,उपसरपंच बळीराम भाऊ सपकाळ यांच्या हस्ते देण्यात आला असून कार्यक्रमास सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच समस्त गावकरी मंडळी यांच्या उपस्थितीत जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी माजी सरपंच नानाभाऊ जमधडे,प्राचार्य विकास टकले,दौलत कानुले,नारायण लोहकरे,जिगे सर,विर सर,बुनगे सर,टेकाळे सर,अशोक जमधडे,ग्रामसेवक व गावातील प्रतिष्ठित नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते..