Ticker

6/recent/ticker-posts

उगवा येथील वार्ड क्र 5 मधील रस्त्यामध्ये साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात



प्रतिनिधी संतोष अटकर 

उगवा येथे वार्ड क्र.5 मधील मुख्य रस्त्यावर घरातील सांडपाणी शौचालयाचे पाणी व पावसाचे पाणी मुख्य रस्त्यात साचले आहे. रस्ता हा कच्या मातीचा आणि बाजूला सांडपाण्याची कुठलीही विल्हेवाट नसल्यामुळे सांडपाणी आणि पावसाचे पाणी मुख्य रस्त्यात साचले आहे. त्यामुळे रस्ता हा चिखलमय झाल्यामुळे उगवा येथील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गावातील लहान मुले वयोवृद्ध व्यक्ती यांना घराच्या बाहेर निघणे कठीण झाले आहे.यामुळे पाण्यामुळे दुर्गंधी मच्छर व साथीचे रोग पसरण्याची दाट शक्यता आहे. 

गेल्या एक महिन्यापासून दूधवाला सुद्धा दूध देण्याकरिता त्या रस्त्यावर येत नाही गावातील सरपंच ग्रामसेवक यांना वारंवार सूचना देण्यात आल्या आहे. पण ग्रामस्थांना उडवा उडविची उत्तरे मिळत आहे. ग्रापंचायतींना निधी उपलब्ध नाही. असेही कारणे त्यांना ऐकायला मिळत आहेत. अशी उगवा येथील ग्रामस्थांची तक्रार आहे. म्हणून त्यांनी असे निवेदन उगवा गावकऱ्यांच्या वतीने मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला, मा. गटविकास अधिकारी पंचायत समिती अकोला, मा. जिल्हा आरोग्य अधिकारी आरोग्य विभाग जिल्हा परिषद अकोला,यांना आज देण्यात आले आहे. तरी आपणास अशी नम्र विनंती की आमच्या वरील परिस्थितीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आम्हाला योग्य तो न्याय मिळून देण्यात यावा ही विनंती . याप्रसंगी सचिन बहाकर शिवसेना उगवा सर्कल प्रमुख व संदीप बोक्से, दत्तात्रय तराळे, व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.