Ticker

6/recent/ticker-posts

विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेतुन यश संपादन करावे :- सुरेश दिवटे



टेंभुर्णी प्रतिनिधी विष्णु मगर 

आजच्या आधुनिक व बदलत्या युगात शिक्षण क्षेत्रात मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे.या स्पर्धावर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची कास धरुन जिद्द ध्येय चिकाटी ,अभ्यासुवृत्ती जोपासुन कठोर परीश्रमातुन यश संपादन करावे असे प्रतिपादन विश्वशांती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा नगरसेवक सुरेश दिवटे यांनी जाफ्राबाद येथे संगणकीय परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन प्रसंगी  बोलतांनी केले.

     जाफ्राबाद येथील ज्ञानसागर माध्यमिक व कनिष्ठ   महाविद्यालयात  केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाद्वारे  घेण्यात येणाऱ्या विविध संगणकीय परीक्षा व मार्गदर्शन केंद्राचा शुभारंभ श्री.दिवटे यांच्या हस्ते करण्यात आला.त्याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी मुख्याध्यापक निवृत्ती दिवटे,प्राचार्य शरद पवार,प्राचार्य विलास नवले,बी.डी.कोल्हे,गणेश भोपळे,परीक्षा प्रमुख पवन जाधव,प्रशांत अंभोरे,प्रा.आप्पासाहेब सपाटे,प्रा.रमेश शेळके,प्रा.निवृत्ती वायाळ,प्रा.सुजीत सोनोने,प्रा.कैलास चिंचोले,प्रा.अजीत म्हस्के आदींची प्रमुख उपस्थीती होती.

     यावेळी पुढे श्री.सुरेश दिवटे म्हणाले की,शिक्षणा बरोबरच विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान आत्मसात करणे ही काळाची गरज निर्माण झाली आहे.आजमितीला स्पर्धा परीक्षा देखील संगणक प्रणाली व्दारे घेण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांनी संगणकाची कास धरावी असे आहवान यावेळी श्री.सुरेशजी दिवटे यांनी केले.यावेळी परीक्षा प्रमुख तथा संचालक पवन जाधव यांनी संगणकाची माहीती देत उपस्थीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.   यावेळी सुनिल पाटील,गजानन वायाळ,श्रीकृष्ण वानखेडे,भरत शेळके,रमेश उखर्डे,भरत शेळके,आनंता कळंबे,

शहादेव ईलग,दिपाली बन्सवाल,मजुषा आत्राम,सुनिता भोसले,ललीता रोडगे,भारती पंडीत,उज्वला वायाळ,स्मीता मोरे,भगवान शिराळे,समाधान टकाळे,भास्कर जाधव,बाबासाहेब दिवटे,सतिश फदाट,योगेश बकाल,लखन भालके,राहुल दिवटे,अविनाश बरडे,गणेश बकाल

संजय जोशी,संतोष शिंदे,दिलीप माळी,यांच्यासह शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांची उपस्थीती होती