गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी
करंजा लाड - एआईएमआईएम प्रदेश उपाध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते हाजी मोहम्मद युसूफ पुंजानी यांच्या वाढदिवसानिमित्त उर्दू अनवार गर्ल्स हायस्कूलमध्ये एक प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात शाळेतील सर्व विद्यार्थिनींना शिक्षणाकडे प्रोत्साहन देण्यासाठी रजिस्टर, पुस्तके आणि पेन वाटप करण्यात आले. तसेच पर्यावरणाचे महत्त्व लक्षात घेऊन वृक्षारोपण करण्यात आले आणि जास्तीत जास्त झाडे लावण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन शैरोदिन सर यांनी केले आणि प्रास्ताविक अतिक अहमद (मुख्याध्यापक) यांनी केले. यावेळी दावत-ए-इस्लामीचे हाफिज नईम सर यांनी झाडांचे महत्त्व अधोरेखित केले, तर शहरातील काज़ी, क़ाज़ी मो. ज़ाकिर साहेब यांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले आणि म्हणाले की, "जिथे शिक्षणाची आवश्यकता असेल तिथे आम्ही नेहमीच मदत करण्यास तयार आहेत ." या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या प्रमुख व्यक्तींमध्ये हाफिज सईद, नज़ीर खान (ठेकेदार), अंसार पठान, गियासु मिर्झा, इक़बाल हुसैन (ठेकेदार), उस्मान खान, मूसा आगबानी, शप्पू हाजी, रियाज़ बाबूसाहब, मिर्झा सलाम, अयूब अली मामू, अमानुल्लाह खान, खालिद खान, इस्माइल खान, मोहसिन शेख आणि एआईएमआईएम सर्व कार्यकर्ते उपस्थित होते
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे मुख्याध्यापक अतिक अहमद होते आणि शाळेतील सर्व शिक्षकांनी या सामाजिक उपक्रमात सहभाग घेतला. त्यापैकी अबरार टिक्की सर, काशिफ सर, कामरान सर, फहीम सर, नईम सर, आणि शाळेतील सर्व शिक्षक आणि कर्मचारी विशेष उपस्थित होते. अशाप्रकारे, हा कार्यक्रम केवळ वाढदिवसाचा उत्सव नव्हता तर समाजाला शिक्षित करण्याचा आणि जागरूक करण्याचा सकारात्मक प्रयत्न होता.
Social Plugin