Ticker

6/recent/ticker-posts

शाळेस दहा संगणक संच

 


बुध  दि . [प्रकाश राजेघाटगे ] 

पुणे येथील टेक महिंद्रा या कंपनीकडून. खटाव तालुक्यातील  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बुधावलेवाडी (विसापूर) या शाळेस दहा संगणक संच  देण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गरज ओळखून  व शाळेने केलेल्या मागणीची पूर्तता कंपनीने केली आहे. कंपनीच्या सीएसआर फंडातून आणि कंपनीत कार्यरत असलेल्या टीम लीडर व विसापूर गावच्या सुकन्या कु. ऋतुजा आंधळकर यांच्या प्रयत्नाने शाळेला हे संगणक देण्यात आले आहेत. याकामी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्यांचा सहकार्य लाभले.यावेळी प्रथमेश सावंत, अरुण बुधावले, सुरेश बुधावले, समीर बुधावले व मुख्याध्यापक विष्णू पाचांगणे हे उपस्थित होते.