अलिबाग(प्रतिनिधी)
कुर्डुस परिसरात गुंडगिरी करणाऱ्या हर्षल पाटील (वय ३०) यास नागाठणे पोलिसांनी हिंगा दाखवला आहे. परिसरात गुंडगिरी करुन त्याने सर्वसामान्य लोकांना जेरीस आणले होते. अखेर एका ट्रकचालकास दारु पिण्यासाठी पैसे देण्यास धमकावल्या प्रकरणी नागोठणे पोलिसांनी त्यावर गुन्हा दाखल केला.
नागोठणे पोलीस ठाणे हद्दीत रविवार (ता.८) रोजी मौजे कुहिरे येथील रिलायन्स कंपनीच्या समोरील मोकळया जागेतील पार्किंगमध्ये हायडोलिक एक्सेल क्र एम एच 06 एक्यु 8261 उभी करुन तिचा चालक बाजूला उभा होता. हर्षल पाटील त्याच्या अन्य तीन साथीदारांनी मोटारसायकल एम एच 06 सी एच 0038 वरुन येत सदरच्या ट्रक चालकास ट्क एवढे दिवस का उभा केला असे बोलून फिर्यादी व साक्षीदार यांच्या गालावर चापट मारून पायावर लाथेने मारहाण केली व ट्रक चालकाकडून 5 हजार रुपयांची मागणी केली. या मारहाणीनंतर हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. ते पैशाची मागणी करीत होते; परंतु ट्रकचालकाकडे रोख रक्कम नव्हती.
त्यामुळे मोटारसायकलवर दोन्ही आरोपीनी ट्रकचालकास मध्ये बसवून तेथून सुमारे 03 किमी गुलमोहर हॉटेलमध्ये नेले. व त्यास हर्षल पाटील यांनी जेवणाचे बील भरण्यास सांगीतले. पैसे भरले नाहीतर ट्रकचालकास ठार मारून टाकेनअशी धमकी दिली. हर्षल पाटील यांनी ट्रकचालकाला खाण्यापिण्याचे 3 हजार रुपये बिल बळजबरीने गुगल पे करण्यास भाग पाडले व ही घटना कोणाला सांगीतले तर ठार मारून टाकेन अशी धमकी दिली. या विरोधात ट्रचालकाने नागोठणे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून हर्षल पाटील व त्याच्या साथिदारावर नागोठणे पोलीस ठाणे गुरनं. 65/2025, मध्ये भा.न्या,सं. 2023 चे कलम 137(2), 140(2),308(2),308(3),115(2),351 (2)(3), 3(5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा अधिक तपास गोटीराम पावरा हे करीत आहेत.
Social Plugin