अंबड प्रतिनिधी, गणेश सपकाळ
आखिल भारतीय ग्राहक पंचायत च्या ठि्य्या आंदोलनास यश घरकुल विभागाला अखेर ऑपरेटर नेमले.याविषयी माहिती अशी की गेल्या पंधरा दिवसापासुन घरकुलाचे लाभार्थी हप्ता मिळत नसल्यामुळे हैराण होते.आज आखिल भारतीय ग्राहक पंचायत चे पदाधिकारी डॉ रमेश तारगे निव्रृत्त मंडळ अधिकारी पोतदार,हनुमान भगत,धर्मराज खापरे,ओंकार कानकाटे,योगेश भडांगे,भागवत ऊढाण,साहेबराव राठोड यासह दोनशे च्या जवळपास घरकुल लाभार्थी नी पंचायत समिती सभापती दालनात घरकुल विभागाचे वैष्णव आणि कार्यालयीन प्रमुख यांना घेराव घालत जो पर्यंत ऑपरेटर नेमत नाही तो पर्यंत आम्ही कार्यालय सोडणार नाही अशी भुमिका घेत सकाळी 10.30 ते 01 वाजेपर्यंत कार्यालयात ठिय्या आंदोलन केले त्यामुळे अर्जुन कव्हळे आणि सचिन पवार यांची नेमणूक गटविकास अधिकारी राजपुत यांनी केली शेवटी लेखी ऑर्डर काढल्यानंतर ठिय्या आंदोलनाचा समारोप केला...
Social Plugin