Ticker

6/recent/ticker-posts

खटाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा

 


बुध  दि .[प्रकाश राजेघाटगे ]  

खटाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी  , खादी ग्रामोद्योगचे संचालक गणेश भोसले यांनी तहसिलदार यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे . 

          निवेदनात पुढे म्हटने आहे की ,  महाराष्ट्र राज्यात तसेच सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात गेली एक महिना झाले सतत पाऊस चालू आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाचा खरिपाचा हंगाम पूर्णपणे वाया गेलेला आहे. शेतकऱ्यांनी जून महिना संपत आला तरीही खरिपाची पेरणी झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होणार आहे तसेच शेतकऱ्यांचे सोसायटी कर्ज बँकेचे कर्ज थकीत राहणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून विद्यार्थीचे शैक्षणिक शुल्क माफ करावे. तसेच तालुक्यातील गोर गरीब लोकांना शासकीय नियमानुसार मदत करावी.  ओल्या दुष्काळ जाहीर करून योग्य ती आर्थिक मदत करावी अशी मागणी आहे. हे निवेदन देताना  खादी ग्रामोद्योगचे संचालक गणेश भोसले , बसपा चे गणेश थोरात, पँथर ग्रुप चे अध्यक्ष भगवान मोरे, जेष्ठ नेते, विठ्ठल नलवडे, जेष्ठ नेते बापूराव वाघमारे, गणेश यादव, रुपेश कांबळे, सुनील वायदंडे, रमेश शेठ बागल होते.