●आदमपूर प्रतिनिधी/महमदरफी मदार आदमपूरकर
बिलोली तालुक्यातील ग्राम आदमपूर येथील कवी गीतकार,पञकार जाफर आदमपूरकर यांची सुकन्या कु.अदिबा आदमपूरकर चा तिसरा वाढदिवस रविवार दि.२९ जून रोजी सायंकाळी वृक्षभेट देऊन पावसाळी वातावरणात चिमुकल्यांसह आनंदाने साजरा करण्यात आला.
आदमपूर ग्राम परिसरातील लहान मुलांना वृक्षभेट देण्याचा संकल्प वन्यजीव प्रेमी तथा कवी,गीतकार, पञकार जाफर आदमपूरकर यांनी साकार केला. त्या अनुषंगाने अदिबा या सुकन्येच्या तिसऱ्या वाढदिवसानिमित्त हा लहानसा उपक्रम राबविण्यात आला. वनसंपदेने आपली भूमी सजली तर रानावनातील पशु,पक्षी,तथा मानव प्राणी जगू शकतील अन्यथा वातावरण चक्र बिघडले तर कुणीही जगू शकणार नाही. लहान मुलांनाही वनांचे महत्त्व कळावे यासाठी वृक्षभेट हा संकल्प पूर्णत्वास गेला.
सदरील वाढदिवसानिमित्त सेवानिवृत्त बँक सहाय्यक फक्रूशा मदार,चांडोळा बँक सहाय्यक महमदरफी मदार,चि.अमान मदार, कु.आमेरा मदार,जाफर आदमपूरकर, कु.अनुश्री नागेश्वर,चि.शुभम नागेश्वर, कु.अनन्या नागेश्वर,चि.लड्डू नागेश्वर,कु.अदिबा आदमपूरकर,चि.आयान शेख,चि.रिहान शेख,चि.सोहम अनपलवार,सौ.सना आदमपूरकर, सौ.बिस्मिल्लाबी मदार,सौ. रेशमा मदार,शेख इरफ़ान सांगवीकर,सौ. शांताबाई नागेश्वर,आदि मान्यवर,महिला व बाल गोपाळांची उपस्थिती होती.सदरील उपक्रम आदमपूर
गाव परिसरात कौतुकास्पद ठरले आहे.
Social Plugin