प्रतिनिधी सागर शिरसाठ देवळा
उबाठा गटाचे नाशिक जिल्ह्यातील माजी महानगरप्रमुख श्री. विलास शिंदे यांच्यासह नाशिक महानगरपालिकेतील सात नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी आज शिवसेना पक्षात उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला.
यावेळी या सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासह नाशिक मनपातील माजी नगरसेवक श्री. संतोष गायकवाड, सौ. नयना गांगुर्डे, श्री. विष्णुपंत बेंडकुळे, श्री. प्रवीण पाळदे, सौ. पल्लवी पाटील, श्री. निलेश ठाकरे, सौ. उषाताई शेळके यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तर उबाठा गटाचे उप महानगरप्रमुख श्री. निवृत्ती इंगोले, जिल्हा परिषद सदस्य श्री. सोमनाथ फडोळ, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष श्री. मोहनीश दोंदे, उबाठा युवासेना तालुका अध्यक्ष श्री. सुनील मते, त्र्यंबकेश्वरचे सभापती श्री. खंडू भोये, सरपंच श्री. रमेश भोये, श्री. दिलीप चौधरी, इगतपुरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष श्री. दशरथ धांडे, श्री. राजेश मोरे, श्री. नितीन भागवत, श्री. दयाराम आहेर, श्री. संकेत सातभाई, श्री. सचिन कर्डीले यांच्यासह असंख्य पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला.
यावेळी खासदार श्री. नरेश म्हस्के, शिवसेना सचिव श्री. राम रेपाळे, शिवसेना उत्तर महाराष्ट्र सचिव श्री. भाऊसाहेब चौधरी, माजी श्री. खासदार हेमंत गोडसे, श्री. किशोर अप्पा करंजकर, जिल्हाप्रमुख श्री. भाऊलाल तांबाडे, महानगरप्रमुख श्री. प्रवीण तिदमे तसेच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Social Plugin