Ticker

6/recent/ticker-posts

आदर्श मदनीस तसेच अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सावित्रीबाई कैलासराव शिंदे सन्मानित



मालेगाव जावेद धन्नू भवानीवाले 

महिला व बालकल्याण विभाग महाराष्ट्र शासन यांच्या निर्णयानुसार 31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त पंचायत समिती अंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायत स्तरातून दोन कर्तबगार महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित केल्या जाणार असून महिला व बाल विकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांची त्यांच्या कार्याची दखल घेत तसेच महिलांच्या समस्या व प्रश्न बाबतीत जाणीव संवेदिशीला असणाऱ्या सामाजिक क्षेत्रात सक्रिय सहभाग असणाऱ्या महिलांची ग्रामपंचायत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कारासाठी गावातून दोन महिलांची निवड करणार असल्याचे शासन परिपत्रक निघाले असून यामध्ये सन्मानपत्र,सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ,तसेच रोख पाचशे रुपये,असा बक्षीसाचे स्वरूप या सन्मानाचअसून कार्यक्रमाद्वारे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा आज 31 मे रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात येत असून या अंतर्गत पांगरी नवघरे ग्रामपंचायतचे प्रशासक वाय वाय पळसकर, ग्राम विक्रांत सचिव कळने,कर्मचारी गजानन नवघरे, तथा नागरिक दीपक शिंदे, रोजगार सेवक ओम नवघरे, अंगणवाडी सेविका सुनीताबाई खडसे तालुका समन्वयक भूषण कोल्हेआदींच्या उपस्थितीत नुकत्याच आदर्श पुरस्कार म्हणून सन्मानित झालेल्या पांगरी नवघरे अंगणवाडी क्रमांक एक च्या मदतीस सावित्रीबाई शिंदे, तसेच वैशाली जाधव समुदायिक आरोग्य कार्यकर्ता, या दोन महिलांना आज कर्तबगार महिला म्हणून ग्रामपंचायत च्या वतीने सत्कार व पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. सदैव कार्यरत असणाऱ्या महिला कर्मचारी म्हणून त्यांची ख्याती आहे आदर्श मदतनीस म्हणून त्यांना नुकताच पुरस्कार तसेच रोख साडेचार हजार रुपये जाहीर झाला असून त्या पाठोपाठ अहिल्यादेवी होळकर पुरस्कारांनाही सन्मान केल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण झाले आहे..