टेंभुर्णी प्रतिनिधी विष्णु मगर
टेंभुर्णी येथील राष्ट्रीय बजरंग दलाच्या वतीने बाल संस्कार शिबिराचे पाच दिवस आयोजित करण्यात आले होते . यामध्ये हिंदू राष्ट्र निर्माण जनजागृती करण्यात आली असून , शेकडो तरुणांनी शहरातील मुख्य रोडवरुन बजरंग दलाच्या गणवेशात पथसंचालन करून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.
आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद व राष्ट्रीय बजरंग दल आयोजित वीर हिंदू विजेता हिंदू शौर्य प्रशिक्षण वर्ग दिनांक २६ मे ते ३० मे पर्यंत आयोजन करण्यात आले होते . या प्रशिक्षण वर्गामध्ये रायफल चालवणे , धनुष्यबाण शिकवणे , कराटे शिकवणे लाठीकाठी फिरवणे, व आपलं संरक्षण करण्यासाठी विविध गुण शिकवण्यात आले. यामध्ये बौद्धिक ज्ञान देवदय धर्माचे ज्ञान व धर्म संस्कार बाल संस्काराचे धडे सुद्धा शिकवले गेले. या पाच दिवसांमध्ये विविध वक्त्यांनी विविध विषयावर या प्रशिक्षणार्थी यांना मार्गदर्शन केले. दिनांक ३० मे रोजी टेंभुर्णी शहरातील शिवाजी महाराज चौकातुन वीर हिंदू विजेता हिंदू असे पत संचलन भव्य रॅली काढण्यात आली . या संचलनामध्ये ७५ प्रशिक्षणार्थी व हजारो हिंदू युवांचा सहभागी झाले होते.
वर्गामध्ये जे जे शिक्षण दिले गेले , त्याचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले . व यावेळे जय श्रीराम चे जय घोष करत शहरातून पत संचलन काढण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष इंद्रजीत सुखदेव देवगिरी प्रांताचे प्रांत अध्यक्ष राष्ट्रीय बजरंग सुभाष मोकरिया व राष्ट्रीय बजरंग दलाचे प्रांत उपाध्यक्ष अविनाश देशमाने व शिक्षक म्हणून गुजरात येथून महावीर गुप्ता मोहित नाशिक येथून विशाल चव्हाण हिंगोली येथून राजू उबाळे व वर्ग प्रमुख म्हणून आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे संघटन मंत्री विकास रिंगे व वर्गाचे नियोजन टेंभुर्णी येथील राष्ट्रीय बजरंग दल च्या कार्यकर्ते नी येणाऱ्या तरुणांना रोज विविध विषयांवर माहिती देऊन बाळकडू दिले.
या कार्यक्रमात टेंभुर्णी बजरंग दलाचे विनोद इंगळे, अविनाश देशमाने, पंकज काबरा, शैलेश डोंमळे, अक्षय गावंडे, संतोष देशमुख ,अक्षय बोराडे, कृष्णा आहेर ,आकाश जाधव ,अमोल देशमुख, सोहम आवटी ,विष्णू भागवत, श्रीकांत उखर्डे ,आशिष भागवत, राजू भागवत, ओम श्री सागर, अभिषेक बारगुडे , योगेश पेट्रोळे ,अनिकेत जमधडे, राजू केवट, विनोद फदाट ,रुपेश कायस्ते , दीपक उखर्डे , सचिन वाघ , बालाजी इंगळे, दीपक वाघ आदींनी परिश्रम घेतले
Social Plugin