Ticker

6/recent/ticker-posts

आठवडी बाजार,अतिवृष्टीमुळे बाजारपेठे मधील नुकसान



प्रतिनिधी @ रामेश्वर तोंडे  लोणी गवळी

आज मेहकर शहरातील आठवडी बाजार येथे अतिवृष्टीमुळे बाजारपेठे मधील नुकसान ग्रस्त भागांची केंद्रीय मंत्री नामदार मा.श्री. प्रतापरावजी जाधव साहेब यांनी प्रत्यक्ष ठिकाणी भेट देवून व्यापारी,भाजीपाला विक्रेते यांच्याशी संवाद साधला.अवकाळी पावसामुळे शहरातील बाजार पेठ परिसरातील दुकानामध्ये पाणी साचले व नाली सफाई त्यांच्या प्रत्यक्ष आढावा घेतला़

प्रशासनाला सूचना केल्या आहेत, की मुख्य रस्ते,बाजारपेठा, इमामवाडा चौक,रामनगर, माळीपुरा,सावजी गल्ली,डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर व शहरातील अन्य ठिकाण चे सर्व रस्ते मधील नालेसफाई तात्काळ सुरू करा. व बाजारपेठेतील साफसफाई करून तेथील नाल्या मोकळ्या करून भाजीपाला विक्रेत्यांना ओट्यावर बसवा अशा सूचना सुद्धा त्याचबरोबर मेहकर मध्ये ज्या ज्या दुकानांमध्ये पाणी गेले आकाश ड्रेसेस पूजा ड्रेसेस सतीश वासराले वस्त्रालय काही बाजारपेठ मधील आतील दुकाने त्यामध्ये महेश सेल्स अनेक दुकान मध्ये अतिवृष्टीचे पाणी गेल्यामुळे त्यांच्या मालांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

यावेळी मा.आ.संजयजी रायमुलकर,शिवसेना ता.प्रमुख सुरेश वाळुकर,शहरप्रमुख श्री.जयचंद बाटीया,श्री.दिलीपराव देशमुख. नगरपरिषद मुख्यधिकारी श्री.राम कापरे मा.नगरसेवक मनोज जाधव तोफिक कुरेशी रामेश्वर भिसे दिवाकर मेहकर कर सुरेश मुंदडा तसेच व्यापारी बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते व,प्रमुख पदाधिकारी, नगरपरिषद अधिकारी,कर्मचारी,शहरातील व्यापारी बांधव,नागरिक उपस्थित होते.