टेंभुर्णी प्रतिनिधी विष्णु मगर
जाफराबाद तालुक्यातील मरठवाडा- विर्दभ सिमेवरील मौज नांदखेडा किन्ही मार्गे देऊळगाव राजा बस सेवा सुरू करावी यासाठी आगार व्यवस्थापक यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. दिनांक ३०/०७/२०१६ रोजी नांदखेडा किन्ही बस सेवा सुरू करण्यात आली होती या रस्त्यामध्ये खड्डे पडल्याने काही दिवसांपूर्वी ड्रायव्हर आणि कंडक्टर यांनी सांगितले की रस्त्यामध्ये खड्डे पडल्याने बस बंद झालेली होती मात्र यावर्षी लालदेव फाटा ते नांदखेडा किन्ही पर्यंत रस्ता संपूर्णपणे चकाचक झालेला आहे
गरीब,हातमजुरी काम करणारे व गरीब शेतकऱ्यांची विद्यार्थी विद्यार्थीनी शाळेत जाण्यासाठी प्रायव्हेट गाड्यांचे भाडेवाड जास्त असल्यामुळे पालकांना ते परवडत नसल्याने विद्यार्थी आणि विद्यार्थीनीने देऊळगाव राजा शाळेत ये जा करण्यासाठी बस सेवा सुरु करावी त्याचं शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये मा.आगार प्रमुख यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. विद्यार्थी व पालकांनी भावना समजून आपण तात्काळ बस सेवा सुरु करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विद्यार्थी व विद्यार्थिनी घेऊन आंदोलन करण्यात येईल असा इशारा पंढरीनाथ म्हस्के मनसे तालुका सरचिटणीस.अनिल जायभाये.रविद्र सरोदे, संतोष सवडे,अतिष सरोदे,अतिष भालेराव आदी उपस्थित होती
Social Plugin