मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले
मालेगाव : सर्व शेतकरी सभासद साठी अकोला - वाशीम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने विविध योजना राबविण्यात येत असतात तेव्हा आपण सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला पाहिजे असे मत जिल्हा बँकेचे संचालक दिलीप जाधव यांनी व्यक्त केले.
मालेगाव येथील जिल्हा बँकेच्या प्रांगणात नुकतेच बँकेच्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त ग्राहक सभाप्रबोधन संपन्न झाली या सभेचे अध्यक्ष स्थान जिल्हा बँकेचे संचालक दिलीप जाधव हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नागरिक तथा माजी संचालक बबनराव गवळी ज्येष्ठ ग्राहक ह भ प मुंडे गुरुजी मा पं स जगदेव ढंगारे माजी नगराध्यक्ष अरुण बळी अकोला वाशिम जिल्हा सहकारी बोर्डाचे संचालक अनिल जाधव, मुख्याध्यापक राधेश्याम घुगे राजू गीत घुगे, किशोर महाकाळ, पप्पू कुटे, काटेकर यांची प्रमुख उपस्थिती होती याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले
तसेच कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलितने करण्यात आले तसेच बँकेच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले दिलीप जाधव यांनी बँकेविषयी त्यांच्या कार्याविषयी शेतकऱ्यांच्या हिताच्या असलेल्या विविध योजना संदर्भात ग्राहकांना विशेष मार्गदर्शन केले यावेळी मुंडे, गवळी, महाकाळ, ढंगारे यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले प्रास्ताविक बँकेच्या शाखा अधिकारी ठाकरे यांनी केले तर संचालन अभिलाष पाटील व आभार प्रदर्शन सुमित मोहाळे यांनी मानले कार्यक्रमाला पांगरी कुटे व मालेगाव मंडळाचे सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष सचिव सभासद यांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Social Plugin