Ticker

6/recent/ticker-posts

ज्ञानाला अध्यात्म व संस्काराची जोड हवी -प. पू. सुंदरगिरीजी महाराज



श्री सेवागिरी देवस्थान तर्फे दहावी  परीक्षेतील यशस्वी विध्यार्थीचा सत्कार 

बुध  दि .[प्रकाश राजेघाटगे ] 

     ज्ञानाला अध्यात्मची जोड हवी. अध्यात्म मधून मानसिक शांतता मिळते. अध्यात्म हा जगण्याचा आधार बनायला हवे. विध्यार्थी वर्गाने अध्यात्म आत्मसात करून मानसिक शांतता मिळायला हवी. ज्ञानाने माणूस समृद्ध होतो. पण ती समृद्धी टिकवण्यासाठी संस्काराची गरज हवी असे मार्गदर्शन श्री सेवागिरी देवस्थानचे मठाधीपती प पू सुंदरगिरीजी यांनी 10 वी परीक्षेतील  यशस्वी  विध्यार्थी वर्गाचे सत्कार प्रसंगी केले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी  सनदी अधिकारी सुरेश जाधव होते. त्यानी सांगितले मुलाच्यामध्ये  गुणवत्ता असेल तर त्याला परस्थिती आड येत नाही. पुसेगाव परिसरात शिक्षण घेवून आज अनेकजण मोठं मोठया पदावर आहेत. तसेच देवस्थान ट्रस्टचे चेअरमन डॉ सुरेश जाधव यांनी सांगितले की, श्री सेवागिरी देवस्थान विध्यार्थी वर्गासाठी अनेक उपक्रम राबवित असते.या ठिकाणी विध्यार्थीसाठी  अभ्यासिका निर्माण करण्यात आली आहे याचा स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करणाऱ्या विध्यार्थीनी लाभ घ्यावा, 

                 यावेळी  पुसेगाव परिसरातील दहावी व बारावी परीक्षेत शाळेतील पहिल्या तीन क्रमांकाचा सत्कार करण्यात आला. यामध्ये पुसेगाव येथील श्री हनुमानगिरी हायस्कूल  , श्री सेवागिरी विद्यालय, इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय,शासकीय विद्या निकेतन, डॉ. राधाकृष्ण इंग्लिश मेडीयम,संत गुंडोजी बाबा विद्यालय विसापूर,हनुमान विद्यालय निढळ,, जांब हायस्कूल जांब, न्यू इंग्लिश स्कुल जाखनगाव, भैरवनाथ विद्यालय रणशिंगवाडी,गणपतरावं काळगे विद्यालय मोळ,नागनाथ उच्च माध्यमिक विद्यालय बुध,शहाजीराजे महाविद्यालय खटाव,राजापूर हायस्कूल राजापूर,महात्मा फुले विद्यालय कटगून,शिवाजी  विद्यालय डिस्कळ,नागनाथ विद्यालय  बुध,सनशाईन इंग्रजी मिडीयम  खटाव इत्यादी शाळेतील पहिल्या तीन क्रमांक च्या विध्यार्थी वर्गाला बक्षीस देण्यात आले. व त्याच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी गरीब विध्यार्थी वर्गाला मदत करण्यात आली.

        प्रास्ताविक देवस्थानचे विश्वस्त बाळासाहेब  जाधव यांनी केले, आभार संतोष वाघ यांनी मानले. सूत्रसंचालन मोहन गुरव यांनी केले. यावेळी  रणधीर  जाधव, गौरव जाधव, सचिन देशमूख विध्यार्थी व पालक उपस्थित होते.