Ticker

6/recent/ticker-posts

पूर बचावात्मक संदर्भात कसबे डिग्रज मध्ये NDRF तर्फे प्रात्यक्षिके



पत्रकार @अभिजित भोईटे ग्रामीण प्रतिनिधी 

नॅशनल डिसास्टर रेस्पॉन्स फोर्स (NDRF) ने सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रज येथे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने NDRF सोबत पूर बचाव प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले. यावेळी पूर नियंत्रण आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी अनेक प्रात्यक्षिके घेतली. प्रात्यक्षिकात बोट ऑपरेशन्स, जीवन रक्षक जॅकेटचा वापर, दोराच्या सहाय्याने बचाव, आणि प्राथमिक उपचार ई प्रात्यक्षिके कसबे डिग्रज–कृष्णा नदी काठी घेण्यात आली

या प्रात्यक्षिकात NDRF, कसबे डिग्रज ग्रामस्थ,ग्रामपंचायत अधिकारी, सदस्य आणि आरोग्य विभाग यांचा समावेश होता.या सर्व प्रात्यक्षिकांचा मुख्य उद्देश आपत्ती धोक्याची बचावात्मक तयारी तपासणे आणि विविध विभागांमधील समन्वय वाढवणे, लोकांना आपत्ती परिस्थितीत आवश्यक असलेल्या उपाययोजनांबद्दल जागरूक करणे, आणि आपत्ती प्रतिसाद क्षमतांचा विकास करणे हे होते.