Ticker

6/recent/ticker-posts

लायन्स क्लब अलिबाग व क्षात्रैक्य समाज अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण व संवर्धन कार्यक्रम संपन्न



अलिबाग (रत्नाकर पाटील)

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करण्यासाठी वृक्षारोपण अत्यंत महत्त्वाचे असल्याने लायन्स क्लब अलिबाग व क्षात्रैक्य समाज अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने कुरुळ येथील दत्त मंदिर, रसाणी टेकडी येथे वृक्षरोपण व संवर्धन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी लायन्स क्लब मेंबर्स व क्षात्रैक्य समाज सभासद व पदाधिकाऱ्यांनी सुमारे दोनशे फळझाडांची लागवड केली याप्रसंगी माहिती देताना लायन्स क्लब अध्यक्ष प्रदीप नाईक यांनी पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी जमिनीच्या किमान ३३% भाग वृक्षांनी व्यापलेला असावा यासाठी आम्ही ही मोहीम हाती घेतली असून या झाडांचे पूर्ण संगोपन करणार असल्याची ग्वाही दिली 

यासाठी लायन्स क्लब चे डिस्ट्रिक्ट कोआँरडिनेटर   अनिल म्हात्रे यांनी त्यांच्यामार्फत सर्व झाडांसाठी ठिबक सिंचन प्रकल्प पुरविनार असल्याचे सांगितले, तसेच क्लब चे फस्ट व्हाईस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर प्रवीण सरनाईक यांनी दत्त मंदिर परिसरात लायन्स क्लब तर्फे पाणी अडवून जिरविण्यासाठी बंधारा बांधून देण्याची उपस्थितांना ग्वाही दिली, क्षात्रै क्य समाजाचे अध्यक्ष द्वारकानाथ नाईक यांनी समाजातर्फे राबविण्यात येणाऱ्या अनेक उपक्रमांची सखोल माहिती दिली, याप्रसंगी दत्त मंदिर ट्रस्ट चे कार्याध्यक्ष ऍड प्रसाद पाटील, रविंद्र वर्तक, श्रीनाथ कवळे, अतुल वर्तक, रमेश पाटील, विठोबा पाटील, तुषार नाईक, अंकिता म्हात्रे, गौरी म्हात्रे, समीर कवळे, नयन कवळे, संतोष पाटील, महेंद्र पाटील, गिरीश म्हात्रे, रोहन पाटील, भगवान मालपाणी, अविनाश राऊळ, अमोघ किंजवडेकर,प्रकाश देशमुख, अनिल आगाशे, नितीन शेडगे, महेश मोघे, मिलिंद मगर इत्यादी अनेक मेम्बर्स व पदाधिकारी उपस्थित होते.