Ticker

6/recent/ticker-posts

बनस्थली विद्यापीठात पीएच.डी. शिक्षण शाखेत अविनाश अनेराये यांची अभिमानास्पद निवड!



देगलूर प्रतिनिधी - जावेद अहेमद

बनस्थली  विद्यापीठ, राजस्थान येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रवेश प्रक्रियेतून शेळगाव छत्री येथील रहिवासी अविनाश विठ्ठलराव अनेराये यांची पीएच.डी. (विशेष शिक्षाशास्त्र) शाखेत निवड झाली आहे. ही निवड गुणवत्तापूर्ण शैक्षणिक पार्श्वभूमी, मेहनत, आणि निष्ठेचे फलित आहे. त्यांच्या या यशामुळे कुटुंबीय, शिक्षक, व मित्रपरिवारात आनंदाचे वातावरण आहे.

अनेराये यांनी अपंग मुलांनसाठी शिक्षण क्षेत्रात अधिक सखोल संशोधन करण्याचा निर्धार केला असून, भविष्यात गुणवत्तापूर्ण शिक्षण व्यवस्था घडवण्याचे ध्येय उराशी बाळगले आहे. बनस्थली विद्यापीठ हे भारतातील प्रतिष्ठित महिला विद्यापीठांपैकी एक असून, येथे पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी देशभरातून विद्यार्थिनींची निवड केली जाते.

या यशाबद्दल अनेराये यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. तसेच निवड झाल्याबद्दल प्रदेश कार्याध्यक्ष.दिव्यांग सेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महाराष्ट्र राज्य. रामदास पाटील सुमठणकर यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. यावेळी बोलताना श्री. सुमठणकर म्हणाले, “ही निवड केवळ तुमच्या अथक परिश्रमांची आणि ज्ञानाच्या प्रति असलेल्या निष्ठेची पावती आहे. शिक्षण क्षेत्रात संशोधन करून समाजाला दिशा देण्याचे तुमचे कार्य नक्कीच प्रेरणादायी ठरेल. तुमच्या पुढील वाटचालीसाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा!”