Ticker

6/recent/ticker-posts

दिव्यांगांसाठीच्या अनुदानात १००० रुपयांची वाढ




*दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी अविरत कार्यरत मा.आमदार बच्चुभाऊ कडू यांच्या प्रयत्नांना यश..!*


अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ 

 दिव्यांग बांधवांच्या प्रत्येक अडीअडचणी बाबत सातत्याने आवाज उठवत,दिव्यांगांच्या  कल्याणासाठी सातत्याने सरकार दरबारी विविध मार्गाने पाठपुरावा करत हक्क मिळून देण्यासाठी माजी आमदार बच्चू भाऊ कडू प्रामुख्याने लढा    उभारत असतात.आणि त्यांच्याच प्रयत्नाने राज्यातील दिव्यांग बांधवांसाठी दरमहा २५०० रुपये अनुदान देण्याचे महाराष्ट्र राज्य सरकारांनी घोषित केले.

राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागांतर्गत चालवल्या जाणाऱ्या विविध योजनांतर्गत मिळणाऱ्या दरमहा १५०० रुपये अनुदानात आता थेट १००० रुपयांची वाढ करून ते २५०० रुपये करण्यात आले आहे.

या निर्णयामुळे संजय गांधी निराधार अनुदान योजना,श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्त वेतन योजनेच्या लाभार्थ्यांना दरमहा २५०० रुपये इतके अर्थसहाय्य मिळणार आहे.म्हणुन दिव्यांग नेते बाबासाहेब भाऊ खरात यांनी बच्चू भाऊ कडू यांचे दिव्यांग बांधवांच्या वतीने व व्यक्तिशःआभार मानले आहे...