मारोती एडकेवार प्रतिनिधी :हिप्पारगा थडी
हिप्पारगा थडी : लेखक दिल दलितांचे कैवारी, आपल्या लेखणीच्या माध्यमातून, कष्टकरांचे व्यथा मांडणारे .साहित्यसम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी, व विनम्र अभिवादन कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिप्परगा थडी येथे साजरी करण्यात आला. यावेळी उपस्थित सर्व शिक्षक शिक्षिका व शालेय विद्यार्थी व शालेय पोषण आहार कर्मचारी, यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्याची माहिती देण्यात आली, फक्त दीड दिवस शिक्षण घेऊन,त्यांनी आपल्या लेखणी च्या, माध्यमातून मराठी साहित्य, विश्वात आढळ स्थान निर्माण केले. माणूस आहे, तोपर्यंत संघर्ष आहे.असा त्यांचा बाणेदार विचार,आजही प्रेरणादायी ठरत आहे.कार्यक्रमाचे आयोजन हिप्परगाथाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा.यांच्या कडून करण्यात आले. असून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान व प्रेरणादायी मूल्य रुजवण्यासाठी हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे.
Social Plugin