मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले
मेडशी :इको क्लब फॉर मिशन लाईफ अंतर्गत जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून 5 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत ‘एक पेड मां के नाम’ या शिर्षांतर्गत शाळांमध्ये वृक्षारोपण मोहिम राबविणेबाबत भारत सरकारचे निर्देश आहेत. यातंर्गत जिल्ह्यातील शाळांतील विद्यार्थी वृक्ष लागवड करणार आहेत.निसर्गाला अनुकूल व पर्यावरणविषयक संवर्धन संवेदनशीलतेचा दृष्टीकोन निर्माण होण्यासाठी शासनाच्या वतीने ‘एक पेड मां के नाम’ ही मोहिम हाती घेण्यात आली आहे. प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांनी या मोहिमेत सहभागी होऊन एक तरी झाड लावणे अपेक्षित आहे. यासाठी प्रत्येक शाळेला किमान 70 वृक्षांची लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून ही मोहिम वनविभगाच्या समन्वयाने राबविण्यात येणार आहे. वृक्षारोपनासाठी शाळांना वनविभागाकडून रोपे देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक शाळांमध्ये इको क्लब फॉर मिशन लाईफ मंच स्थापन करून पर्यावरणविषयक उपक्रम शाळा स्तरावर व परिसरामध्ये प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश आहे.
तसेच विद्यार्थ्यांनी वृक्ष लागवड करताना आई-वडील, भाऊ-बहिण किंवा काका-काकू यांच्यासोबत वृक्ष लागवड करून तसा फोटो काढून यु-डायस नंबर व फोटो अपलोड करायची आहे. या मोहिमेतंर्गत जिल्ह्यातील जिल्हा परिषद, अनुदानीत, खासगी स्वयंअर्थसहाय्य अशा सर्व व्यवस्थापनातील शाळांचा सहभाग असून लाखो विद्यार्थी वृक्ष लागवड करणार आहेत. ही मोहीम 30 सप्टेंबरपर्यंत राबविण्यात येणार असताना मोहिमेअंतर्गत वृक्ष लागवड करण्यासाठी शाळांकडे रोपट्यांची कमतरता भासू नये यासाठी शासनाकडून सामाजिक वनीकरण विभागाला शाळांना रोपटे पुरविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.‘एक झाड मां के नाम’ मोहिम यशस्वी करण्यासाठी जिल्हा प्रशासनासह शाळा प्रशासन, विद्यार्थी व त्यांचे पालक, स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरज आहे. या मुळे मेडशी येथील नागनाथ माध्यमिक विद्यालय येथील विद्यार्थ्यांनी हया उपक्रमा अंतर्गत झाडे लावून ह्या मध्ये सहभाग घेतला आहे.ह्या वेळी या कार्यक्रमाला शाळेतील मुख्याध्यापक कैलास बोरचाटे, रजनी गुट्टे, चव्हान सर,राधाबाई जाधव, किशोर सावरकर,आरती साठे सह शाळेतील विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.
Social Plugin