दौंड प्रतिनिधी -कानिफनाथ मांडगे
लहान मुलांना झाडांची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने आज केडगाव येथील शारदा सदन प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना झाडांचे महत्त्व समजावून, एक मित्र एक वृक्ष ग्रुपच्या वतीने 250 वृक्षांचे वाटप करण्यात आले, यामध्ये 10 प्रकारचे देशी वृक्ष होते कडुलिंब, पिंपळ, आपटा, कांचनार, शिवण, ताम्हण, बकुळ, सिसम, करंज व ताम्हण इत्यादी प्रकाराचे वृक्ष वाटप करण्यात आले
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.अरुणिमा वसंत पाटील व शाळेतील शिक्षिका व एक मित्र एक वृक्ष ग्रुपचे सदस्य उपस्थित होते. या रोपांसाठी डॉक्टर शंकर चव्हाण, सुनीलजी पितळे, गणेश नेवलकर, दिलीप सदाशिव बडे, विशाल वेंकटेश लाखे यांनी आर्थिक सह्या केले, अशी माहिती एक मित्र एक वृक्ष ग्रुप चे अध्यक्ष प्रशांत मुथा यांनी दिली . आर्थिक साह्य केलेल्या व्यक्तिचे मुथा यांनी आभार मानले
Social Plugin