*नागरिकांना लाभ घेण्याचे आवाहन -जावेद धन्नू भवानीवाले( सामाजिक कार्यकर्ते)*
मालेगाव दि.१७ जुलै, २०२५.
रोजी मा. संचालक, ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार यांनी Awaas+ २०२४ चे सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी दि. ३१ जुलै, २०२५ पर्यंतची अंतिम मुदतवाढ दिलेली आहे.राज्यातील विविध जिल्ह्यातील आवास प्लस सर्वेक्षण २०१८ मधील प्रतिक्षा यादीत समाविष्ट न झालेले व सिस्टीमद्वारे अपात्र झालेले परंतु सद्यस्थितीत पात्र असलेले सर्व कुटुंबांचे प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण टप्पा-२ अंतर्गत नवीन १० Exclusion Criteria नुसार दि.३१ जुलै, २०२५ पर्यंत सर्वेक्षण पूर्ण करुन कोणतेही बेघर कुटुंब या सर्वेक्षणापासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
तसेच ज्या ग्रामपंचायतीमध्ये सर्वेक्षण पूर्ण झाले आहे, अशा सर्व ग्रामपंचायतीना आवास सॉफ्ट प्रणालीवर "सर्वेक्षण पूर्ण" झाल्याचे दि. ३१ जुलै, २०२५ पर्यंत चिन्हांकित करण्यात यावे. जिल्ह्यातील १००% स्वयं-सर्वेक्षण प्रकरणांचे सर्वेक्षकांद्वारे पुष्टीकरण करण्याची कार्यवाही दि. ३१ जुलै, २०२५ पर्यंत पूर्ण करण्यात यावी. व Assisted Survey द्वारे ज्या कुटुंबांना सिस्टीमद्वारे Flagged केले आहे. अशा कुटुंबांचे Checker द्वारे Verification करण्याची कार्यवाही दि. ३१ जुलै, २०२५ पर्यंत पूर्ण करण्यात यावी.
या पुढे सर्वेक्षणासाठी कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही, याची नोंद घ्यावी असे सूचना पत्र (डॉ. राजाराम दिघे) संचालक, ग्रामीण गृहनिर्माण, महाराष्ट्र राज्य यांच्या कडून मा.प्रधान सचिव, ग्रामविकास व पंचायत राज विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई मा. विभागीय आयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालय अपर आयुक्त (विकास), विभागीय आयुक्त (सर्व) यांना माहिती व कार्यवाहीस्तव. प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (सर्व) तसेच कार्यकारी अध्यक्ष,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, तथा मुख्य कार्यकारी अधिकारी,यांना देण्यात आले आहे तरी मालेगाव तालुक्यातील सर्व ग्रामीण भागातील गोर गरीब नागरिकांनी शासनाकडून मिळालेल्या मुदत वाढीचा लाभ घेऊन लवकरात लवकर आपल्या नावाची नोंद करून घरकुल योजनेचा लाभ घ्यावा असे आहवान मेडशी येतील सामाजिक कार्यकर्ते जावेद धन्नू भवानीवाले यांच्याकडून करण्यात आले
Social Plugin