Ticker

6/recent/ticker-posts

शाळेची भिंत कोसळून चार विद्यार्थी किरकोळ जखमी; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर



देगलूर प्रतिनिधी

देगलूर : तालुक्यातील भायेगाव येथील छत्रपती शाहू माध्यमिक विद्यालयाची भिंत कोसळून दहावी वर्गात शिक्षण घेणारे चार विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना १८ जुलै रोजीदुपारी ४ वाजण्याच्या सुमारास घडली असून जखमी विद्यार्थ्यांना शाळा प्रशासनाने तातडीने उपचारासाठी  उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.    मात्र या घटनेमुळे तालुक्यातील शाळांच्या गुणवत्तेसह विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहेतालुक्यातील भायेगाव येथील छत्रपती शाहू माध्यमिक विद्यालय या खाजगी शाळेत विद्यार्थ्यांना पाचवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण दिले जाते.

या शाळेत आजूबाजूच्या परिसरातील जवळपास 116 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.त्यापैकी दहावी वर्गात शिक्षण घेणारे जवळपास वीस विद्यार्थी आहेत. 18 जुलै रोजी दुपारी चार वाजताच्या दरम्यान यापैकी बहुतांश विद्यार्थी हे खेळाचे तास असल्यामुळे ग्राउंड वर खेळण्यासाठी गेले होते.तर पाच ते सहा विद्यार्थी वर्गातच बसून होते.

या दरम्यान अचानकपणे भिंत कोसळून दहावी वर्गात शिकत असलेले

 १) श्रीकांत गंगाधर खुरे, वय १६ वर्ष, रा.कावळगड्डा ता.देगलूर  

२) शितल गणपत तलवारे,वय १६ वर्ष, रा. आचेगाव ता.देगलूर

३) विष्णुकांत नामदेव मिरले, वय १६ वर्ष, रा. कावळगड्डा ता.देगलूर

४) मल्लिकार्जुन शिवाजी मिरले, वय १६ वर्ष, रा. कावळगड्डा, ता. देगलूर

चार विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेमुळे पालक वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. तालुक्यातील इतर शाळांची दुरावस्था पाहता भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी  देगलूरचे गटशिक्षणाधिकारी तोटावार यांनी संबंधित मुख्याध्यापकांची बैठक बोलावून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सक्त ताकीद द्यावी अशी मागणी पालक वर्गांमधून केली जात आहे.