Ticker

6/recent/ticker-posts

बालविकास शाळेत मताधिकार बजावण्याचे धडे गिरवत विद्यार्थी प्रतिनिधी निवडणूक संपन्न.



मालेगाव प्रतिनिधी): -जावेद धन्नू भवानीवाले

    येथील बालविकास मंदिर प्राथमिक शाळेत चालू शैक्षणीक सत्रातील मताधिकार बजावण्याचे धडे गिरवत विद्यार्थी प्रतिनिधी निवडणूक संपन्न. बालवयात लोकशाही जीवन पध्दतीत मताधिकार बजावण्याचे धडे गिरवत विद्यार्थी प्रतिनिधी निवडण्यासाठी राबविण्यात आलेल्या निवडणुकीसाठी केंद्राध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल भिसडे, प्रमुख अतिथी पालक संदीप सावले, निवडणूक निर्णय अधिकारी नंदकिशोर भुसारी,मतदान अधिकारी अनिलकुमार सरकटे,जीजेबा घुगे,गणेश शिंदे यांनी जबाबदारी पार पडली.

   विद्यार्थ्यांना शालेय जीवनामध्ये लोकशाहीचे महत्त्व कळावे आणि मतदान प्रक्रियेची संपूर्णपणे माहिती होण्यासाठी शाळा स्तरावर ही निवडणूक घेण्यात आली या निवडणुकी मध्ये इच्छुक उमेदवारांची निवड शाळेमधून करण्यात आली व विद्यार्थ्यांचा मताधिकार बजावून आपला प्रतिनिधी निवडण्यात आला. मतपत्रिका वाटप करून विद्यार्थी निवडणूक घेण्यात आली. पुढील प्रमाणे शालेय मंत्रिमंडळ निवड करण्यात आली शाळा स्तरावर शाळा मंत्री- आरोही चंदू खाडे, शाळा उपमंत्री निधी संतोष सोभागे,विवेक शिवाजी गायकवाड, परिपाठ मंत्री वैष्णवी सुनील धोंगडे, स्वच्छता मंत्री जानवी लक्ष्मण कांबळे, वृक्षसंवर्धन मंत्री पवन ज्ञानेश्वर सावळकर, ऊर्जामंत्री वैदेही संदीप सावले, क्रीडामंत्री जानवी महेंद्र कांबळे, अर्थमंत्री श्रावणी मनोज खिल्लारी, उपस्थिती ध्वजमंत्रीआयुष जीवन बेलारकर, शालेय पोषण आहार मंत्री वीर विजय अवचार इत्यादी मंत्र्यांची नेमणूक करण्यात आली 

यानंतर शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल भिसडे यांनी विद्यार्थ्यांना लोकशाही चे महत्त्व सविस्तरपणे पटवून दिले.निवडून आलेल्या मंत्र्यांना आपापली जबाबदारी समजून सांगितली या निवडणुकित निवडून आलेल्या विजयी विद्यार्थ्यांचे शपथविधी घेऊन,त्यांचे स्वागत शाळेतील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले सदर शालेय निवडणुकीचे आयोजन विभाग प्रमुख गणेश इढोळे यांनी केले सदर निवडणुकीच्या यशस्वीतेसाठी शाळचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंदानी मोलाचे सहकार्य करून कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडला.