Ticker

6/recent/ticker-posts

कागदपत्रे व शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी आपल्या स्तरावरुन शिबिर आयोजित करण्याची मागणी निवेदन



समाजातील वंचित घटकांच्या मदतीसाठी व त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय विमुक्त घुमन्तु जनजाती महासभा महाराष्ट्र प्रदेश संघटना प्रयत्न करत 

अंबड प्रतिनिधी, गणेश सपकाळ

भटके विमुक्त समाजातील गरजू लोकांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक लागणारे कागदपत्रे मिळवण्यात अडचणी येत आहेत त्यामुळे त्यांच्यासाठी शिबिर आयोजित करण्याची मागणी करणारे निवेदन राष्ट्रीय विमुक्त घुमन्तु जनजाती महासभा महाराष्ट्र प्रदेश संघटनेच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की भटके विमुक्त समाजासाठी शासनाकडून राबविण्यात येणारे शिबिरे आपल्या स्तरावरुन गरजू लाभार्थ्यांना विविध आवश्यक लागणारे कागदपत्रे आणि शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी १.भटके विमुक्त समाजातील लाभार्थ्यांना आवश्यक लागणारे विविध कागदपत्रे आधार कार्ड,राशन कार्ड,मतदान कार्ड,जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखले,संजय गांधींच्या योजनेच्या पगारीचा लाभ इत्यादी कागदपत्रे विनाअट उपलब्ध करून द्यावी.२.भटके विमुक्त समाजातील काही लाभार्थ्यांनी व्यक्तिक विकत घेतलेले खाजगी जमीनीवरील नोटरीचे प्लॉट सर्व्हे नंबर ८०,१०१,१२४,३८ मधील शासकीय आणेवारी रक्कम भरुन ७/१२ वर फेर करुन देण्यात यावे.३.भटके विमुक्त समाजासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एक दिवसीय शिबिर घेण्यात यावे.

४.वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळ व प.पु.गंगानाथ महाराज आर्थिक विकास महामंडळ मार्फत एक एक लाख रुपये कर्ज देण्यात यावे.५.यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना मंजूर झालेली असून १०० कुटुंबांना घरकुलचा लाभ देण्यात यावा,६.भटके विमुक्त समाजाच्या वस्तीत अंगणवाडी प्राथमिक शाळा सुरु करण्यात याव्यात,७.भटके विमुक्त समाजाच्या वस्तीत आरोग्य शिबिर घेण्यात यावे भटके विमुक्त समाजाच्या गरजूंना १ ते ३० पर्यंतच्या वयोगटातील लाभार्थ्यांना आधार कार्ड तात्काळ देण्यात यावे.मा.साहेबांनी जातीने लक्ष घालून आपल्या स्तरावरुन शिबिर घेऊन भटके विमुक्त समाजाच्या लोकांना न्याय द्यावा तसेच समाजातील वंचित घटकांच्या मदतीसाठी शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी आपल्याकडून अंमलबजावणी करण्यात यावी अशा इत्यादी मागणीचे निवेदन राष्ट्रीय विमुक्त घुमन्तु जनजाती महासभा महाराष्ट्र प्रदेश संघटनेचे जिल्हाध्यक्ष धर्मराज तात्याराव बाबर,सेवा हॉस्पिटल डॉ.अभय जाधव,यु.अध्यक्ष मी.रा.प्रा.अंकुश चव्हाण,गोर सेना नामदेव पवार,राजू भिमराव शेवाळे,तुकाराम शिंदे,रमेश देविदास राठी,बाळू शिंदे यांच्या उपस्थितीत मा.तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे..