Ticker

6/recent/ticker-posts

कै.दत्ताजी भाले विद्यालय अंबड येथे आषाढी एकादशी निमित्त मोठ्या थाटामाटात व उत्साहात बालगोपालाच्या दिंडीचे आयोजन



अंबड प्रतिनिधी, गणेश सपकाळ

आषाढी एकादशी निमित्त लाखोच्या संख्येने वारकरी भक्त पंढरपूर मध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात आषाढ महिन्यात शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी असे म्हणतात.कै.दत्ताजी भाले विद्यालय येथे आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्माई यांची पालखी मोठ्या थाटामाटात सजवण्यात आली.यावेळी विद्यार्थी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भारतीय संत परंपरे नुसार वारकरी वेशभूषा विविध संतांची वेशभूषा साकारून वारकरी संप्रदायाप्रमाणे सहभागी झाले. याप्रसंगी केंद्रप्रमुख श्री.प्रदीप जोशी सर व सर्व शिक्षकवृंदांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले.त्यानंतर भगवे पताके,टाळ मृदंग मुखात अखंड हरिनामाचे नामस्मरण करीत दिंडी शाळेच्या प्रांगणातून राऊत नगर,कोर्ट रोड, वडगावकर हॉस्पिटल,मत्स्योदरी ज्ञानमंदिर शाळा तसेच रमेश शहाणे यांच्या घरापासून विठ्ठल रुक्माई मंदिर या ठिकाणी पोहोचली.दिंडी चालत असताना विद्यार्थ्याने फुगडी विविध लेझीम प्रात्यक्षिक, पावली,विठुरायांचा नामस्मरण करीत भगवंताच्या भेटीचं आनंद घेतला.विविध ठिकाणी माता पालक यांनी पालखीचे पूजन करून पुष्पवृष्टी करण्यात आली.भक्तिमय वातावरणामुळे परिसर आनंदाने दुमदुमून गेला.

यावेळी व्यासपीठावरती सौ.ज्योती भाभी ठाकूर (भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या उपाध्यक्ष), शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष-वेंकटेशजी गोसावी,दिपक भैय्या ठाकूर(जिल्हा उपाध्यक्ष-भा ज पा जालना)डॉ.राजेंद्रजी भाला,घुगे सर, माधुरीताई बागडे,डॉ सुषमाताई भाला,घुगे ताई, हनुमानजी धांडे,पांडुरंग भाई जामदरे,भाजपाचे नेते रमेश शहाणे,शिवप्रसाद लाहोटी,बाळासाहेब पांढरे, नरेश बुंदलखंडे,बांगर सर,विनायक सर,तसेच कॉलनीतील प्रतिष्ठित उद्योजक व नागरिक,भाविक भक्तगण असे सर्व मान्यवर तसेच शाळेचे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री सुधाकर घायतडक सर तसेच प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री प्रदीप जोशी सर व विद्यार्थी सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.यावेळी प्रणिता वाघमारे यांनी भक्ती गीत सादर केले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री प्रदीप जोशी सर यांनी केले.घुगे सर यांनी मनोगत व्यक्त केले.विद्यार्थ्यांनी विविध भक्ती गीते, अभंग,धार्मिक भारुडे सादर केली.यानंतर अध्यक्षीय समारोप करताना ज्योती भाभी म्हणाल्या विद्यार्थ्यांमध्ये अध्यात्मिक व धार्मिक वारसा जपवणूक व्हावी व विद्यार्थ्यांमध्ये एकात्मिक समरसता निर्माण व्हावे यासाठी दिंडी तसेच धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.हा मोलाचा संदेश आपण आपल्या विद्यार्थ्यांमध्ये रुजावा यासाठी आपल्या शाळेच्या वतीने विविध उपक्रम घेण्यात येते.त्यानंतर श्री दिपक भैय्या ठाकूर तसेच ज्योती भाभी ठाकूर व सर्व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते आरती करण्यात आली.त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना फराळाचे वाटप करण्यात आले.सर्व विद्यार्थ्यांनी रांगेत विठ्ठल- रुक्माई चे दर्शन घेऊन फराळ घेतले.

कार्यक्रमाची सांगता शांती मंत्राने झाली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन-श्री योगेश दातीर सर यांनी केले. आभार प्रदर्शन श्री अनिल चव्हाण सर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक वृंदांनी परिश्रम घेतले.यावेळी परिसरातील सर्व माता पालक उपस्थित होते.