मराठी पत्रकार परिषदेस चिवटे कुटुबियांकडुन १ लाख रुपयांचा ठेव धनादेश
बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने दरवर्षी पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या पत्रकारांचा विविध पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे कुटुंबियांच्या तीन पिढ्या मराठी पत्रकार परिषदेशी जोडलेल्या आहेत,स्वातंत्र्य सैनिक स्व.मनोहरपंत चिवटे,नरसिंह मनोहरपंत चिवटे व मंगेश नरसिंह चिवटे व महेश नरसिंह चिवटे या तीन पिढ्यांत पत्रकारितेचा समृध्द वारसा जोपासला जात असुन यावर्षी पासून आरोग्य पत्रकारिता क्षेत्रात कार्य करणार्या पत्रकारास स्वातंत्र्य सैनिक स्व.मनोहरपंत चिवटे आरोग्य पत्रकारिता पुरस्कार सुरु करण्यात आला असुन अकरा हजार रुपये रोख व सन्मान चिन्ह,सन्मान पत्र असे त्याचे स्वरुप आहे,
मुंबई येथे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद पत्रकार सन्मान सोहळ्यात या पुरस्कारासाठी आवश्यक निधी म्हणून ज्येष्ठ पत्रकार नरसिंह मनोहरपंत चिवटे यांनी मराठी पत्रकार परिषदेला 1 लक्ष रुपयांचा ठेव स्वरूपातील धनादेश सुपूर्द केला. या प्रसंगी ज्येष्ठ नेते,राज्यसभा सदस्य खा. शरद पवार, संपादक मधुकर भावे,मंगेश चिवटे उपस्थित होते. मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्याकडे हा धनादेश अधिकृतपणे सुपूर्द करण्यात आला.आरोग्य क्षेत्रातील पत्रकारितेला प्रेरणा देणारा हा पुरस्कार वर्षानुवर्षे अधिक प्रभावी व्हावा, या उद्देशाने हा निधी मराठी पत्रकार परिषदेच्या निधीमध्ये जमा करण्यात आला आहे
पत्रकार परिषदेकडून १ लक्ष रुपयांच्या ठेव धनादेशाबद्दल चिवटे कुटुंबियांचे विशेष आभार मानन्यात आले.यावेळी किरण नाईक,मिलिंद अष्टीवकर,विशाल परदेशी,दीपक कैटके,राजा आदाटे यांसह पत्रकार बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.
Social Plugin