प्रशासनाचे पर्यटकांना आवाहन, वर्षभरात १०९ बळी
अलिबाग (रत्नाकर पाटील)
जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने धरणे धबधबे वाहायला सुरवात झाली आहे. पावसाळी पर्यटन स्थळे बहरायला सुरवात झाली आहे. अनेक पर्यटक धबधबे नद्या आणि इतर ठिकणी पर्यटनासाठी येत असतात. मात्र अतिउत्साही पर्यटकांमुळे दुर्घटना होण्याची शक्यताही वाढली आहे. नाइलजास्तव प्रशासनाला काही ठिकाणी बंदी घालावी लागते गेल्या वर्षीची आकडेवारी बघता ९ तालुक्यात मिळून साधारणपणे १०९ जणांचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.
पावसाळ्यात रायगड मधील निसर्गरम्य ठिकाणे पर्यटकाना खुणावत असतात. धबधबे नद्या आणि हिरवीगार वनराई पर्यटकांना आकर्षित करत असते.त्यामुळे पर्यटकाना सह अनेक ट्रेकरही येथे येत असतात. अलिबाग, कर्जत, खोपोली, माणगाव, महाड, पोलादपूर, मुरुड, रोहा या तालुक्यात मोठ्या प्रमाणात निसर्गाच्या छायेत पावसाळ्यात धबधबे वाहत असतात. त्यामुळे मित्र मंडळी, कुटुंब यासह स्थानिक तसेच पर्यटक हे या धबधब्यावर जात असतात. पडणाऱ्या पाण्याचे तुषार अंगावर झेलत मौज मजा करीत असतात.
धबधबे असलेल्या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना खाण्या पिण्याची सुविधा स्थानिकांच्या माध्यमातून उपलब्ध केली जाते. जेणे करून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होत असतो. त्यामुळे त्यांचेही पावसाळी पर्यटन सुरू झाले की अर्थाजन होत असते. मात्र अनेकजण हे धबधबे वर जाऊन मद्य प्राशन करतात. जेणेकरून इतरांना त्याचा नाहक त्रासही सहन करावा लागतो. त्याचबरोबर मद्य प्राशन करून धबधबे, धरण यामध्ये उतरून स्वतच्या जीवितास धोका निर्माण करीत असतात. अती उत्साहीमुळे पाण्यात बुडण्याच्या घटनाही घडत आहेत. त्यामुळे प्रशासनातर्फे अशा धबधब्यावर पर्यटकांना जाण्यास बंदी केली जाते ज्या ठिकाणी पावसाळी पर्यटनाला गर्दी होत आहे. त्याठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. पोलीस बंदोबस्त तैनात करणे, मद्य घेऊन जाण्यास, पिण्यास बंदी घालणे, पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करणे या बाबी कडे लक्ष दिल्यास पावसाळी पर्यटन मुळे जिल्ह्याला आर्थिक चालना मिळू शकते.
समुद्राच्या ठिकाणी, धबधबे च्या ठिकाणी स्थानिक लोकांकडून प्रशासनाकडून नोटीस लावल्या जातात मात्र पर्यटक दुर्लक्ष करून पाण्यात जातात. पावसाळ्यात पाण्याचा अंदाज येत नाही त्यामुळे अनेकदा दुर्घटना घडत असतात.
जिल्ह्यात गेल्या वर्षभरात श्रीवर्धन, खालापूर खोपोली माथेरान नेरळ अलिबाग मुरुड माणगाव महाड आणि दिघी सागरी येथे १०९ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असल्याची नोंद पोलीस प्रशासनाकडन मिळाली श्रीवर्धन येथे समुद्राच्या पाण्यात बुडून 2 जण राबवली धरणामध्ये एक तर हरिहरेश्वर येथे प्रदक्षिणा घालताना एक असा 5 जणांचा मृत्यू झाला खालापूर तालुक्यात एकूण २१ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची नोंद आहे पाताळगंगा नदी, पाली भुतावली डॅम मोरबे डॅम ,कलोते डॅम , आंबा नदीचे पात्रात, परखंडे येथील पाण्याच्या ओहळात, नढाल यथील तलावात अशी ठिकाणे आहेत. खोपोली मध्ये प्रसिद्ध असलेल्या धबधब्यात ३ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची नोंद आहे.
माथेरान येथे शॉर्लेट येथे पाण्यात बुडून जण जण मयत झाली नेरळ येथील साळोख डॅम , पाषाणे बिरडोल उल्हास नदीच्या पात्रात , पाली भूतवली डॅम, पेज नदीमध्ये अश्या ठिकाणी एकूण १३ जण मयत झाले. सर्वात जास्त मयत हे अलिबाग येथे झाले असून ३० जणांचा मृत्यू समुद्रात बुडून झाला आहे.
माणगाव तालुक्यात कुंडलिका नदीमध्ये ण जणांचा बुडून मृत्यू झालं आहे. तर मुरुड येथील काशीद बीच चिकणी बीच, समुद्र किनारी एकदरा खाडीत अश्या विविध ठिकाणी १८ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. महाड तालुक्यात मांडले धबधबा, रायगड किल्यावरील गंगासागर तलावात अश्या दोन ठिकाणी ३ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. दिवेआगर येथील दिघी सागरी समुद्र किनारी कुडके येथील धरणात वेळास समुद्रात अश्या ठिकाणी ११ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.
Social Plugin