Ticker

6/recent/ticker-posts

सर्पमित्रांची कौतुकास्पद कामगिरी




पालघर (ज्ञानेश चौधरी) प्रतिनिधी

पालघर तालुक्यातील सफाळे पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या तांदुळवाडी किल्यावर ट्रेकिंग साठी आलेले बोरिवली मुंबई येथील यश शिरोडकर 33 वर्षे आणि खुशी शहा 26 वर्षे हे किल्यावर चढून गेल्यावर परतीचा मार्ग विसरले . त्यांनी गुगल वर सर्च केल्यावर सफाळे पोलिस स्टेशन चा संपर्क क्रमांक मिळाला पोलिस स्टेशन शी संपर्क झाल्यावर त्यांनी सर्पमित्र यांचा संपर्क क्रमांक दिला 
सर्पमित्र पिंट्या मानकर आणि त्यांचे साथीदार तसेच तांदुळवाडी पोलीस पाटील आणि पोलिस यांनी त्यांचा शोध घेऊन सुखरूप त्यांना त्यांचा तांदुळवाडी येथे ठेवलेल्या मोटारसायकल पर्यंत आणून सोडले. 
सर्पमित्र यांच्या कामगिरी तसेच पोलीस पाटील आणि पोलिस यांच्या सहकार्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.