दौंड चे आ. राहुल दादा कुल महापुजेसाठी उपस्थित
दौंड तालुका प्रतिनिधी -कानिफनाथ मांडगे
ता.६ .काल डाळींब बन ता.दौंड येथे आषाढी एकादशी निमित्त घेतले लाखो भाविकांनी दर्शन. काल आषाढी एकादशीच्या दिवशी प्रती पंढरपूर समजल्या जाणाऱ्या डाळिंब बन (ता.दौंड)येथे लाखो भाविकांनी दर्शन घेतलेदेवशयनी आषाढी एकादशी निमित्त आपल्या दौंड तालुक्यातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणारे श्री. क्षेत्र डाळिंबबन येथे श्री. विठ्ठलाच्या महापूजेसाठी दौंड चे आमदार राहुल दादा कुल व आजी ,माजी पदाधिकारी , कार्यकर्ते इत्यादी उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठल - रुक्मिणीची कृपा सदैव सर्वांवर असू दे, चांगला पाऊस, पीक होऊ दे, बळीराजा शेतकरी - गोरगरीब, कष्टकरी यांचे घरी सुख - समृद्धी नांदू दे अशी प्रार्थना विठुरायाच्या चरणी केली. तसेच विठ्ठलनामाच्या गजरात तल्लीन झालेल्या सर्व भाविक भक्तांना आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा आमदार राहुल दादा कुल यांनी दिल्या.!
पहाटे पासून दर्शनासाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळाली . रात्री उशिरापर्यंत येथे दर्शनासाठी भाविकांची गर्दी होती
Social Plugin