Ticker

6/recent/ticker-posts

गायवळ येथील नैसर्गिक निविष्ठा निर्मिती केंद्रांला शेतकऱ्याचा उत्कृष्ट प्रतिसाद


प्रतिनिधी_---संजय भरदुक मंपिर

ग्राम गायवळ येथील डॉ. पंजाबराव देशमुख बायो इनपुट लॅब प्रशिक्षण केंद्र व गांडूळ खत निर्मिती प्रकल्प गायवळ सदर केंद्र हे संत गाडगेबाबा ऑरगॅनिक फार्म ग्रुप गायवळ द्वारा संचलित असून प्रकल्प संचालक आत्मा वाशिम यांच्याकडे नोंदणीकृत आहे तसेच धर्मदाय आयुक्त वाशिम यांच्याकडे रजिस्टर आहे विस शेतकऱ्यांनी एकत्र येऊन नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून सदर प्रशिक्षण केंद्र व गांडूळ खत निर्मिती प्रकल्पामध्ये विविध नैसर्गिक निविष्ठाची निर्मिती केली यामध्ये दशपर्णी अर्क  जीवामृत  बिजामृत नीम अर्क  वर्मी वॉश  वर्मी कल्चर ट्रायकोड ड्रामा  गांडूळ खत  कोंबडी खत बायोडायनामिक कंपोस्ट मायक्रोरायजा  रायझोबियम एस नाईन कल्चर निर्मिती अशा विविध नैसर्गिक निविष्ठा निर्मिती करून नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना शेतीच्या सेवेसाठी व जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढण्यासाठी उपलब्ध करून दिल्या जात आहे ते सुद्धा अतिशय अल्पशा सेवा दरामध्ये शास्त्रशुद्ध पद्धतीने तयार करून शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या आहेत .

प्रशिक्षण केंद्र व प्रकल्पामध्ये वीस देशी गाईचे संगोपन केले जाते देशी गायीच्या गोमूत्र व गोबर चा या ठिकाणी योग्य वापर होत आहे . गाईच्या शेणापासून गोबर गॅस निर्मिती करून बायोगॅस्लरीचा ग्रुपमधील शेतकरी शेतामध्ये वापर करतात गावातील महिला व तरुणांना बारा महिन्यासाठी रोजगार उपलब्ध झालेला आहे.

    परिसरामध्ये उपलब्ध नैसर्गिक संसाधनाचा योग्य वापर करून. व नॅशनल प्लांट हेल्थ इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट हैदराबाद यांच्या प्रशिक्षण संयोगातून व येथील शास्त्रज्ञ व संस्थाप्रमुख यांच्या मार्गदर्शनातून पी.डि.के.व्ही आयडॉल शेतकरी शेतीनिष्ठ रवींद्र गायकवाड यांनी रोज पैसे देणारी शेती ही संकल्पना साकारून गावातील महिला व तरुणांना बारा महिन्यासाठी रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे डॉ. पंजाबराव देशमुख बायो इनपुट प्रशिक्षण केंद्र व गांडूळ खत निर्मिती प्रकल्प गायवळ तालुका कारंजा जिल्हा वाशिम च्या माध्यमातून नैसर्गिक शेती करणाऱ्या परिसरातील तसेच यवतमाळ बुलढाणा अकोला अमरावती येथील शेतकऱ्यांना बारा महिने नैसर्गिक निविष्ठा अल्पशा दरामध्ये उपलब्ध होत आहे सदर हंगामामध्ये नैसर्गिक निविष्ठा निर्मिती केंद्रांनी अवघ्या दीड महिन्यात सव्वा दोन लाखाची नैसर्गिक निविष्ठाची विक्री करून नैसर्गिक शेतकरी ग्रुपच्या माध्यमातून येथील शेतकरी आत्मनिर्भर होत आहेत.

 *आत्मा संस्थेचे वेळोवेळी तांत्रिक सहयोग मार्गदर्शन*

डॉ. पंजाबराव देशमुख बायो इनपुट प्रशिक्षण केंद्र व गांडूळ खत निर्मिती प्रकल्प गायवळ येथील कार्यकारी टीमला कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा वाशिम प्रकल्प संचालिका मा. अ.महाबळे यांचे वेळोवेळी तांत्रिक मार्गदर्शन मिळत आहे तसेच कृषी विज्ञान केंद्र करडा यांच्या संपूर्ण टीमचे सुद्धा सदर प्रशिक्षण केंद्राला तांत्रिक मार्गदर्शन मिळत आहे . डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील शास्त्रज्ञाची सुद्धा वेळोवेळी मार्गदर्शन मिळत आहे.असे असल्याचे प्रशिक्षण केंद्रप्रमुख सौ भाग्यश्री गायकवाड यांनी कळवले.