Ticker

6/recent/ticker-posts

लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या वतीने जालना जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप



कैलास कोल्हे @ ग्रामीण प्रतिनिधी 

जालना: लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट च्या माध्यमातून दि. 2 ते 5 जुलै 2025 रोजी जालना जिल्ह्यातील  मंठा, वाटुर, भाटेपुरी व बदनापुर    सेंटरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. या शैक्षणिक साहित्याचे वाटप लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या जालना विभागाचे वरिष्ठ प्रकल्प अधिकारी श्री जोमा मस्ती यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या या  कार्यक्रमाचा प्रसंगी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व पालकांनची उपस्थित होते. या कार्यक्रमाचा प्रसंगी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

     लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट ही संस्था वेगवेगळ्या प्रकल्पाच्या माध्यमातून काम करत आहे. मुलांचा सर्वागिण विकास व्हावा या साठी 2008 पासुन जालना जिल्ह्यात मंठा, वाटुर, जालना, बदनापुर व भाटेपुरी या ठिकाणी काम करते आहे. या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना साठी ही मोठ्या प्रमाणात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. या संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक मदत ही पुरवली जाते. या संस्थेच्या संस्थापिका श्रीमती. डाॅ. विल्यी डाॅक्टर या आहेत. 

विद्यार्थ्यांना चांगल्या मोठ्या प्रमाणात त्यांचा शैक्षणिक विकास हा साध्य केल्या जातो.  या शैक्षणिक वर्षात 282 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या साहित्यामध्ये विद्यार्थ्यांना बॅग, रजिस्टर, कंपास, चिञकला वही व आलेख पुस्तक इत्यादी साहित्य हे वाटप करण्यात आले. या शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाचा निमित्ताने आलेल्या अतिथीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व या संस्थेच्या माध्यमातून आपण मिळालेल्या मदतीच्या माध्यमातून आपण स्वताःचा पाया वर उभे राहीले पाहीजे व शिक्षण घेऊन मोठ्या पदावर गेले पाहीजे असे त्यांनी सांगितले. 

   या प्रसंगी लाईट ऑफ लाईफ ट्रस्टचे आनंदो प्लस प्रकल्पाचे जालना विभाग समन्वयक जगदिश सातपुते, आनंदो प्लस प्रकल्पाचे मंठा विभाग समन्वयक प्रवीण धाड, एस एफ एस ई पी प्रकल्पाचे जालना विभाग समन्वयक सुबोध खंदारे तसेच केद्र कार्यकारी कैलास कोल्हे, शिवाजी काजळाकर, अमोल गोंडगे, आकाश राठोड तसेच शिक्षक अमोल ठोकरे, जितेंद्र खिल्लारे, नवनाथ कावळे, प्रल्हाद खरात, जनार्दन राठोड व सोनाली कोरडे यांची उपस्थिती होती.