देगलूर - प्रतिनिधी- जावेद अहेमद
मौजे सगरोळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीस बांधकाम निधी द्या अशी मागणी सगरोळी परिवर्तन समितीच्या वतीने विश्वनाथ पाटील समन ,शंकर महाजन यानी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांच्याकडे केली आहे मौजे सगरोळी हे गाव नांदेड जिल्ह्यात सगळ्यात मोठे गाव असून गावची लोकसंख्या अंदाजे 14000 एवढे आहे मतदारसंख्या 5500 आहे सगरोळी हे गाव पंचक्रोशातील मुख्य बाजारपेठ असल्यामुळे आजूबाजूच्या गावातील जनता उपचारासाठी सगरोळी प्राथमिक आरोग्य केंद्रात येतात पण प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत सन 2022 पासून मोडकळीस आली असल्याचे जिल्हा परिषद विभागचे अभियंता यांनी इमारत बाबत चौकशी केली असता ती इमारत वापरण्यायोग्य नाही असा अहवाल त्यांनी जिल्हा परिषद सादर केला आहे पण प्राथमिक आरोग्य केंद्र व तालुका अधिकारी यांनी शासनाकडे अनेक वेळेस इमारत मोडकळीस आल्याचे व दुरुस्ती करण्याचे विनंती करूनही प्रशासन याकडे लक्ष देत नाही.
सध्या परिस्थितीत प्राथमिक आरोग्यंद्राची एवढी बिकट परिस्थिती झाली असून इमारतीचे काही भाग रुग्णांच्या व तेथील कर्मचाऱ्यांच्या अंगावर पडले आहे यामुळे काही लोकांना दुखापती झाली आहे. पण तेथील वैद्यकीय अधिकारी हे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मोकळ्या प्रांगणात असलेल्या जागेत रुग्णांची तपासणी करत आहेत सध्या पावसाळा सुरू असल्याने सततच्या पावसामुळे ती इमारत पूर्णपणे पडण्याची शक्यता नाकारता येत नाही तिथे रुग्णांना तपासणीसाठी जागा नसल्यामुळे आरोग्य केंद्रात रुग्ण तपासणी बंद पडण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे त्वरित नवीन बांधकाम निधी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी परिवर्तन समितीच्या वतीने विश्वनाथ पा समन,शंकर महाजन यानी केली आहे तसेच नांदेड लोकसभेचे खासदार रवींद्र चव्हाण यांनीही सगरोळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या संदर्भात संबंधित विभागास पत्राद्वारे इमारत दुरुस्तीची मागणी केली आहे तर नांदेड जिल्ह्याचे राज्यसभेचे खासदार डाॅ.अजितजी गोपछडे यांनी आरोग्य आरोग्यमंत्र्यास मुंबई येथे भेट घेऊन संबंधित इमारतीची माहिती देऊन त्वरित निधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली आहे.
Social Plugin