प्रतिनिधी सय्यद माजीद कुरणखेड
भारतीय लष्करात दाखल असलेल्या अकोला तालुक्यातील कुरणखेड गावचे सुपुत्र नितेश घाटे यांना कर्तव्यावर असताना वीरमरण आले असून, त्यांचे पार्थिव बुधवार, ३० जुलै रोजी मूळगावी कुरणखेड येथे पोहचणार असून दुपारी १२ वाजता हनुमान वस्ती परिसर कुरणखेड येथे अंत्यसंस्कार पार पडणार आहे. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.
कुरणखेड या गावचे भूमिपुत्र असलेले नितेश मधुकर घाटे हे गत १५ वर्षांपासून भारतीय सैन्यात फाईव्ह मराठा बटालियन मध्ये आपली सेवा देत होते. ते गेल्या काही दिवसांपासून अयोध्या येथे कर्तव्यावर होते. सोमवार, २८ रोजी कर्तव्यावर असताना त्यांना विद्युत धक्का लागला. यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे घाटे परिवारात मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असून, कुरणखेड गावासह संपूर्ण अकोला जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. या दुर्दैवी घटनेबाबत खासदार अनुप धोत्रे व आमदार हरीश पिंपळे यांनी शोक व्यक्त केला. बुधवारी दुपारी १२ वाजतापर्यंत नितेश घाटे यांचे पार्थिव कुरणखेड या गावात पोहचणार असून, त्यांनंतर त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.
Social Plugin