Ticker

6/recent/ticker-posts

जय हनुमान श्रावणी दिंडीचे पंढरपूरला प्रस्थान , बुधमध्ये विठूनामाचा गजर



      बुध  दि .[प्रकाश राजेघाटगे ] . 

जय हनुमान श्रावणी पायी दिंडी सोहळयाचे बुध येथून पंढरपूरकडे आज दि .३० रोजी सकाळी ९वाजता प्रस्थान झाले . ग्रामस्थांनी येथील गावाच्या  वेशीवर विठूनामाच्या जयघोषात निरोप दिला .   यावर्षी दिंडीचे १५ वे वर्ष आहे .                 बुध येथील कैवल्य सम्राट चक्रवर्ती पारायण मंडळ व ग्रामस्थांतर्फ जय हनुमान श्रावणी पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले . सकाळी ८ .३० वाजता बुध बाजारपेठेतील श्री . हनुमान मंदिरामध्ये उपसरपंच अभयसिंह राजेघाटगे व ह .भ.प. विठ्ठल खाशाबा सुर्यवंशी यांच्या हस्ते वीणापूजन करण्यात आले . यावेळी बबनराव पाटणकर ,  दिंडीचालक जनार्दन बागवडे ,   दिंडी अध्यक्ष अंकुश जगदाळे  ,  , सचिव नितीन खोत , चोपदार प्रकाश बागेकरी, हरिभाऊ खोत  , हरिभाऊ त्रिपुटे , रामचंद्र सातपुते, हरिभाऊ धोंगडे ,राजू दरेकर , अनंत वास्टकर  , लक्ष्मण नादकाने  , धनाजी शिंदे  , सदानंद खटके ,रुद्वाक्ष बोडके , राजेंद्र पवार , राजेंद्र गादेवाडीकर , बाळासाहेब इंगळे , के.ड़ी . पवार , अँड . संदेश सातभाई , संजय नलवडे , महेंद्र जगताप , सुधीर जगदाळे , विजय नलवडे , गिरणार जगताप ,  राहुल कदम , अधिक जगदाळे  ,  गणेश सातपुते , सुधाकर कुंभार ,सुनिल गायकवाड , व पुसेगाव , नेर ,रणसिंगवाडी , राजापूर, पांगरखेल , काटेवाडी , डिस्कळ अनपटवाडी , शिंदेवाडी , मोळ , धावडदरे,गादेवाडी येथील वारकरी संप्रदायातील ग्रामस्थ व बुध येथील ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या   .        

श्री हनुमान मंदिरापासून दिंडीला सुरुवात झाल्यानंतर  गावातून महिलांनी ठिकठिकाणी वारकऱ्यांचे . स्वागत केले .स्टॅण्ड परिसरात दिंडी आली असता भाविकांनी , ग्रामस्थांनी , मनोभावे दर्शन घेतले . 'ज्ञानोबा -तुकाराम ' च्या जयघोषात , अभंगाच्या  तालावर  वारकरी भक्तीरसात न्हाऊन गेले . देहभान विसरून  सर्व वारकरी विठूनामाचा गजर करीत नाचत होते . यावेळी महिला व पुरुषांनी फुगडया खेळल्या . भक्तिमय वातावरणात उपस्थितांनी  ठेका धरला . कपाळी वैष्णवाचा टिळा , बुक्का , हातात टाळ , वीणामृदंग  आणि मुखावरचा भक्तिभाव . अशा वातावरणात दिंडी सुरु झाली . ह.भ.प. विवेकानंद वासकर महाराजांच्या प्रेरणेतून ही दिंडी सुरू केली आहे . दिंडी बुध येथून  निघून बिदाल , म्हसवड , तांदूळवाडी असा प्रवास करीत पंढरपूर येथे दाखल होईल . चंद्रभागा स्नान व देवदर्शन झाल्यानंतर बारशीच्या  जेवणानंतर दिंडी परतीचा प्रवास सुरू होईल